पुढारी ऑनलाईन डेस्क: ओडिशातील बालासोर जिल्ह्यात २ जून रोजी झालेल्या भीषण रेल्वे अपघात प्रकरणी ( Odisha Train Tragedy ) केंद्रीय अन्वेषण विभागाने ( सीबीआय ) पाच जणांना ताब्यात घेतले आहे. यामध्ये एका रेल्वे अधिकार्याचाही समावेश असल्याचे वृत्त आहे.
ओडिशातील भीषण रेल्वे अपघाताचा तपास सीबीआयचे दहा सदस्यीय पथक करत आहे. याप्रकरणी रेल्वे अधिकार्यांसह अनेकांची चौकशी झाली आहे. रविवारी सायंकाळी पाच जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. दरम्यान, या घटनेवेळी प्रत्यक्षपणे जबाबदार असणार्या ९ अधिकार्यांची चौकशी केली जात आहे. यामध्ये सहायक स्टेशन मास्तर आणि गेट मॅनचाही समावेश आहे.
सीबीआयने बहनगा बाजार रेल्वे स्थानक सील केले आहे. सीबीआयच्या परवानगीशिवाय या स्थानकावर कोणत्याही ट्रेनला थांबू दिले जाणार नाही. याबाबत दक्षिण-पूर्व रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी (CPRO) यांनी म्हटलं आहे की, पुढील आदेशापर्यंत बहनगा बाजार रेल्वे स्थानकावर कोणतीही ट्रेन थांबणार नाही.
सीबीआयचे पथक बहनगा बाजार रेल्वे स्थानकावर सखोल तपास करत आहे. सीबीआयने येथील विविध संगणकांच्या हार्ड डिस्कही जप्त केल्या आहेत. याशिवाय अनेक महत्त्वाची नोंदवलेली तथ्येही गोळा करण्यात आली आहेत. नंतर बहंगा स्थानकात खाजगी नंबर एक्सचेंज बुक तपासले. यावेळी टीमने रिले रूम, पॅनल रूम आणि डेटा लॉकर सील केल्याचे सूत्रांनी सांगितले.
हेही वाचा :