

पुढारी ऑनलाईन डेस्क : काँग्रेस नेते राहुल गांधी नुकतेच अमेरिकेला गेले होते. तिथे त्यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला होता. यावर आज ( दि. १० ) केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
गुजरातमधील सिद्धपूर येथे मोदी सरकारला नऊ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित सभेत बोलताना केंद्रीय मंत्रीअमित शहा
म्हणाले, परदेशात जाऊन देशाचा अपमान करणे कोणत्याही नेत्याला शोभत नाही. राहुल गांधी हे भारताचा अपमान करण्याची एकही संधी सोडत नाहीत. प्रत्येक परदेश दौऱ्यात ते आपल्या चुकांची पुनरावृत्ती करत आहेत.
कोणत्याही देशभक्त व्यक्तीने परदेशात जाऊन देशाच्या राजकारणावर चर्चा करू नये, विदेशात जाऊन देशाच्या राजकारणावर चर्चा करणे आणि देशाचा निषेध करणे हे कोणत्याही पक्षाच्या नेत्याला शोभत नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.
मागील ९ वर्षांमध्ये मोदी सरकारच्या काळात देशाने अनेक मोठे बदल पाहिले आहेत; पण काँग्रेस भारतविरोधी बोलणे थांबवत नाही. देशात उन्हाळा असला की, राहुल गांधी विदेश दौर्यावर जातात, परदेशात जावून देशाचा निषेध करतात. राहुल गांधी यांनी त्यांच्या पूर्वजांकडून शिकावे, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.
हेही वाचा :