नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : चॅट जीपीटी (ChatGPT) सध्या जगभर चर्चेत आहे, पण तुम्हाला माहीत आहे का की, ज्यांनी ते तयार केले त्या सॅम ऑल्टमन (Sam Altman) यांनाचा स्वतःच्या या प्लॅटफॉर्मवर फारसा विश्वास नाही. वास्तविक, सॅम ऑल्टमन हे ChatGPT ची मूळ कंपनी ओपन एआय (OpenAI) चे सीईओ (CEO) आहेत आणि सध्या ते भारतात आले आहेत. (openAI ceo sam altman react on ChatGPT)
सॅम ऑल्टमन यांनी सांगितले की त्यांचाही ChatGPT वर पूर्ण विश्वास नाही. वास्तविक, भारतासह जगभरातील वापरकर्ते पत्र लिहिण्यासाठी, प्रतिमा तयार करण्यासाठी आणि अनेक नवीन प्रश्न विचारण्यासाठी या प्लॅटफॉर्मचा वापर करतात. इतकेच नाही तर अनेकांचा चॅटजीपीटीच्या उत्तरावर पूर्ण विश्वास आहे.
भारत भेटीवर आले आहेत सॅम ऑल्टमन (ChatGPT)
खरं तर, आयआयआयटी दिल्लीमध्ये (IIIT Delhi) आयोजित एका कार्यक्रमादरम्यान, एका पत्रकाराने सॅम ऑल्टमनला एआय बद्दल प्रश्न विचारला. सॅम ऑल्टमनने उत्तरात सांगितले आहे की चॅटजीपीटीने दिलेल्या उत्तरावर त्यांचा विश्वास कमी आहे, तर जगातील कोणत्याही व्यक्तीने दिलेल्या उत्तरावर त्यांना अधिक विश्वास आहे.
सॅम ऑल्टमन यांनी असेही सांगितले की भारत हे एआय इनोव्हेशनचे केंद्र आहे. एआय हे जगातील सर्वात परिवर्तनकारी तंत्रज्ञान असल्याचे त्यांनी सांगितले आहे. भारताला AI सह विकसित होताना पाहून आनंद होईल, असे त्यांनी म्हटले आहे.
भारतासाठी काय आहे Open AI ची योजना
त्यांच्या मुलाखतीत त्यांनी पुढे सांगितले आहे की OpenAI या कंपनीने ChatGPT तयार केले आहे, त्यांची भारतात AI स्टार्टअप सुरू करण्याची योजना आहे. यासोबतच त्यांनी चॅटजीपीटीच्या शक्तीचे नियमन करण्याचीही गरज असल्याचे सांगितले आहे.
अधिक वाचा :