एक हजार रुपयांची नोट पुन्‍हा चलनात येणार?, RBI गव्हर्नर म्‍हणाले…

एक हजार रुपयांची नोट पुन्‍हा चलनात येणार?, RBI गव्हर्नर म्‍हणाले…

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : दोन हजार रुपयांच्‍या नोटाबाबत नुकताच केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला. या नोटा बँकेत जमा केल्‍या जात आहेत. त्‍यामुळे आता चलनातून ५०० रुपयांच्‍या नोटा बंद होवून पुन्‍हा एकदा एक हजार रुपयांची नोट चलनात येणार, अशी चर्चा सुरु होती. यावर RBI गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी आज ( दि. ८) द्वि-मासिक पतधोरण जाहीर केल्‍यानंतर उत्तर दिले.

या वेळी शक्तीकांत दास म्‍हणाले, "रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया चलनातून ५०० रुपयांची नोट चलनातून काढून टाकण्याची किंवा १००० रुपयांच्या नोटा पुन्हा चलनात आणण्याची कोणतीही योजना नाही. कोणीही अफवा पसरवू नयेत किंवा पैजाही लावू नयेत."
२,००० रुपयांच्या ८५ टक्के नोटा बँकेत ठेवी म्हणून परत आल्या

दोन हजार रुपयांच्‍याएकूण ३.६२ लाख कोटी रुपयांच्या नोटा चलनात होत्या. आता दोन हजार रुपयांच्‍या सुमारे १.८ लाख कोटी रुपयांच्या नोटा परत आल्या आहेत. चलनात असलेल्या २,००० रुपयांच्या नोटांपैकी हे अंदाजे ५० टक्के आहे. परत आलेल्या २,००० रुपयांच्या नोटांपैकी ८५ टक्के नोटा बँकेत ठेवी म्हणून परत आल्या आहेत, तर उर्वरित नोटा बदलण्यासाठी आहेत, असेही दास यांनी या वेळी स्‍पष्‍ट केले.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news