Wrestlers Protest : ‘आम्ही चर्चेसाठी तयार’, केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांचे कुस्तीपटूंना निमंत्रण

Wrestlers Protest : ‘आम्ही चर्चेसाठी तयार’, केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांचे कुस्तीपटूंना निमंत्रण

नवी दिल्ली, पुढारी ऑनलाईन : केंद्रीय क्रिडा मंत्री अनुराग ठाकूर (Union Sports Minister Anurag Thakur) यांनी दिल्ली येथे आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंना चर्चेसाठी निमंत्रण दिले आहे. 'आम्ही चर्चेला तयार आहोत', असे म्हणत ठाकूर (Anurag Thakur) यांनी एक प्रकारे केंद्र सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांनी ट्विट करत आपली प्रतिक्रिया दिली आहे.

आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंनी (Wrestlers Protest) केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांची शनिवारी (दि. 3) मध्यरात्री भेट घेतली होती. ऑलिम्पिक पदक विजेता बजरंग पुनिया याने माध्यमांना याबाबत माहिती दिली होती की, कुस्तीपटू आणि त्यांच्या प्रशिक्षकांची शनिवारी (3 जून) रात्री केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत बैठक झाली. या बैठकीत गृहमंत्र्यांनी प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिल्याचेही यावेळी बोलताना पुनिया म्हणाला होता.

भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आणि खासदार बृजभूषण शरण सिंह (Brij Bhushan Sharan Singh) यांच्यावर महिला कुस्तीपटूंनी लैंगिक शोषणाचा (Sexual Harassment) आरोप केला आहे. विनेश फोगट, साक्षी मलिक, बजरंग पुनिया यांसारखे अनेक दिग्गज कुस्तीपटू भारतीय कुस्ती महासंघाच्या अध्यक्षांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

दरम्यान, स्थानिक आणि राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरुनही कुस्तीपटूंच्या अंदोलनाची दखल घेतली गेली. त्यातच केंद्रीय गृहमंत्र्यांच्या भेटीनंतर कुस्तीपटू आश्वस्त झाले आणि कामावर पुन्हा रुजू झाले. पण त्यांनी आपले आंदोलन सुरूच असल्याचेही सांगितले. त्यामुळे आता क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी मंगळवारी (5 जून) मध्यरात्रीनंतर केलेल्या एका ट्विटमधून 'सरकार कुस्तीपटूंशी त्यांच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यास तयार आहे. मी पुन्हा एकदा कुस्तीपटूंना चर्चेसाठी आमंत्रित केले आहे,' अशी भूमिका स्पष्ट केली.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news