Odisha Train Accident : भविष्यात अपघात टाळण्यासाठी रेल्वेला मिळणार सुरक्षा ‘कवच’; जाणून घ्या नेमके काय आणि कसे आहे हे ‘कवच’ | पुढारी

Odisha Train Accident : भविष्यात अपघात टाळण्यासाठी रेल्वेला मिळणार सुरक्षा 'कवच'; जाणून घ्या नेमके काय आणि कसे आहे हे 'कवच'

पुढारी ऑनलाइन डेस्क : Odisha Train Accident : ओडिशाच्या बालासोर येथील बहनागा बाजार स्टेशनवर शुक्रवारी ३ रेल्वे गाड्यांच्या झालेल्या भीषण अपघातानंतर सध्या रेल्वेला सुरक्षा ‘कवच’ मिळणार असल्याची चर्चा सुरू आहे. या कवच मुळे भविष्यात रेल्वे अपघाताला ब्रेक लावता येणार आहे, असे सांगितले जात आहे. 2024 पर्यंत सर्व रेल्वे गाड्यांमध्ये हे कवच स्थापित केले जाईल, अशी माहिती रेल्वे मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. जाणून घेऊ या नेमके काय आहे ‘कवच’. तसेच या कवचमुळे भविष्यात कसे टाळले जाऊ शकतात अपघात.

रेल्वे मंत्रालयाचे प्रवक्ते अमिताभ शर्मा यांनी शनिवारी कवच विषयी माहिती दिली आहे. त्यांच्या माहितीनुसार कवच ही एक टीसीएएस (ट्रेन धडक बचाव प्रणाली) आहे. या प्रणालीमुळे दोन रेल्वेगाड्यांची धडक होण्यापासून रोखले जाऊ शकते. त्यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे गेल्यावर्षीच या प्रणालीचे परीक्षण पूर्ण करण्यात आले आहे. Odisha Train Accident तसेच काही रेल्वे लाईनवर याच्या उपयोगासाठी मंजुरी देखील देण्यात आली आहे. पुढील वर्षापर्यंत ही प्रणाली अथवा कवच सर्व रेल्वे गाड्यांमध्ये स्थापित केले जातील. शर्मा यांनी सांगितल्याप्रमाणे टीसीएएस ही प्रणाली एकाच रुळावर आल्यानंतर दोन्ही ट्रेनला स्वचलित रुपाने ब्रेक लावण्यात सक्षम आहे.

Odisha Train Accident : काय आहे कवच’

भारतीय रेल्वेने धावत्या गाड्यांची सुरक्षा वाढवण्यासाठी स्वचलित ट्रेन सुरक्षा (एटीपी) प्रणाली विकसित केली आहे. त्याला रेल्वे मंत्रालयाने कवच असे नाव दिले आहे. कवच प्रणाली रिसर्च डिझाईन्स अँड स्टँडर्ड्स ऑर्गनायझेशन (RDSO) ने भारतीय उद्योगाच्या सहकार्याने स्वदेशी विकसित केलेली ATP (अँटी ट्रेन प्रोटेक्शन) प्रणाली आहे. मार्च २०२२ मध्ये दक्षिण मध्य रेल्वेने भारतीय रेल्वेच्या ट्रेन ऑपरेशन्समध्ये सुरक्षिततेचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी त्याची चाचणी केली होती. ही संपूर्ण सुरक्षा पातळी-4 मानकांसह आधुनिक इलेक्ट्रॉनिक प्रणाली आहे.

या प्रणालीमुळे लोको पायलटला धोक्याच्या वेळी सिग्नल पासिंग आणि ओव्हर स्पीडिंग टाळण्यास मदत करेल. इतकेच नव्हे तर दाट धुक्यासारख्या प्रतिकूल हवामानात ट्रेन चालवण्यास देखील मदत करेल. अशाप्रकारे, कवच ट्रेन ऑपरेशन्सची सुरक्षा आणि कार्यक्षमता वाढवेल.

Odisha Train Accident : कवच/एटीपी नेमके कसे काम करते?

कवच प्रणाली मुख्यत्वे करून धोक्याचे (लाल) सिग्नल ओलांडणाऱ्या रेल्वे गाड्यांना संरक्षण देण्यासाठी आणि टक्कर टाळण्यासाठी विकसित केली आहे. लोको पायलटला वेग मर्यादेनुसार ट्रेन नियंत्रित करण्यास अपयशी ठरल्यास ते ट्रेन ब्रेकिंग सिस्टम स्वयंचलितपणे सक्रिय करते आणि दोन ट्रेनच्या इंजिनमधील धडक प्रतिबंधित करते.

Odisha Train Accident : कवच किंवा एटीपी प्रणालीची वैशिष्ट्ये

1. धोक्यात सिग्नल पासिंग प्रतिबंधित (SPAD)
2. ड्रायव्हर मशीन इंटरफेस (DMI) / लोको पायलट ऑपरेशन कम इंडिकेशन पॅनेल (LPOCIP) मध्ये प्रदर्शित सिग्नलच्या स्थितीसह ट्रेनच्या हालचालीचे सतत अपडेट
3. ओव्हर स्पीडिंग टाळण्यासाठी स्वयंचलित ब्रेकिंग
4. रेल्वे फाटक ओलांडताना स्वयंचलित शिट्टी वाजणे
5. कवच प्रणालीने सुसज्ज असलेल्या दोन इंजिनमधील टक्कर टाळणे
6. आणीबाणीच्या परिस्थितीत SOS संदेश देणे
7. नेटवर्क मॉनिटर सिस्टमद्वारे ट्रेनच्या हालचालींचे केंद्रीकृत थेट निरीक्षण

हे ही वाचा :

Biggest Train Accidents In India | २०११ नंतर घडले ‘हे’ ८ मोठे रेल्वे अपघात, ओडिशाातील अपघाताने २०१६ मधील दुर्घटनेच्या आठवणी झाल्या जाग्या

Train Accident Coromandel Express : ‘कुणाचे डोके नव्हते कुणाचे हात..पाय’; २ वर्षांचे बाळ मात्र वाचले; रेल्वे अपघाताचे प्रवाशाकडून वर्णन; मृतांचा आकडा 233 वर

Odisha Train Accident Video : ओडिशा रेल्वे अपघात : काळजाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ

Back to top button