ओडिशा रेल्‍वे अपघात : रेल्वेमंत्री वैष्णव यांनी केली सीबीआय चौकशीची शिफारस | पुढारी

ओडिशा रेल्‍वे अपघात : रेल्वेमंत्री वैष्णव यांनी केली सीबीआय चौकशीची शिफारस

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : ओडिशातील भीषण रेल्‍वे अपघाताची सीबीआय चौकशी करण्याची शिफारस रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी केली आहे.

बालासोर जिल्ह्यातील अपघातस्थळी माध्यमांशी बोलताना वैष्णव म्‍हणाले, ओडिशातील भीषण रेल्‍वे अपघाताचे कारण आणि त्याला जबाबदार असलेल्या दोषींची ओळख पटली आहे. इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग आणि पॉइंट मशीनमध्ये केलेल्या बदलांमुळे हा अपघात झाला.

आम्ही कोणतीही शक्यता नाकारली नाही. रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी चौकशी पूर्ण केली असून अहवालाची प्रतीक्षा असल्याचेही वैष्णव यांनी स्‍पष्‍ट केले आहे. बेंगळुरू-हावडा सुपरफास्ट एक्स्प्रेस आणि शालिमार-चेन्नई सेंट्रल कोरोमंडल एक्स्प्रेस आणि मालगाडीचा शुक्रवारी संध्याकाळी ७ वाजता बालासोरमधील बहनगा बाजार स्टेशनजवळ अपघात झाला. या अपघातात आतापर्यंत २७५ प्रवाशांचा मृत्यू झाला असून १,१७५ प्रवासी जखमी झाले आहेत.

हेही वाचा : 

 

Back to top button