Odisha train accident : ओडिशा रेल्‍वे अपघातातील मृतांचा आकडा २८८ वर : पंतप्रधान मोदी म्हणाले, “दोषींवर …” | पुढारी

Odisha train accident : ओडिशा रेल्‍वे अपघातातील मृतांचा आकडा २८८ वर : पंतप्रधान मोदी म्हणाले, "दोषींवर ..."

पुढारी ऑनलाईन डेस्क : ओडिशाच्या (Odisha) बालासोरमध्ये झालेल्या कोरोमंडल रेल्वे (Coromandel Express) अपघातात मृतांच्या संख्येत वाढ झाली आहे. सध्या मृत्यूंची संख्या २८८ वर पोहोचली आहे. दरम्‍यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रेल्वेमंत्री अश्विन वैष्णव यांनी अपघात स्थळावर जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला. या अपघातातील दाेषींची गय केली जाणार नाही, असे पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी स्‍पष्‍ट केले आहे.

या दुर्घटनेनंतर एनडीआरएफ, रेल्वेच्या पथकाकडून आतापर्यंत अनेक लोकांना सुखरुप बाहेर काढण्यात आले आहे. पंतप्रधान मोदी यांनी आज (दि. ३) दुपारी घटनास्थळी भेट देऊन या घटनेतील मृतांबाबत शोक व्यक्त केला.

मानवी चुकांमुळे बालासोर रेल्वे अपघात

ओडिशाच्या बालासोर जिल्ह्यातील भीषण रेल्वे अपघातातील मृतांचा आकडा २८८ वर पाोहचला आहे. ७४७ लोक जखमी झाले. हा अपघात मानवी चुकांमुळे झाला असावा, अशी शक्यता रेल्वेच्या सिग्नलिंग कंट्रोल रूमच्या प्राथमिक अहवालातून व्यक्त करण्यात आली आहे.

रेल्वेच्या खरगपूर विभागाच्या सिग्नलिंग कंट्रोल रूमच्या व्हिडिओ फुटेजनुसार, अपघाताच्या काही मिनिटांपूर्वी ट्रेनने चुकीच्या ट्रॅकने प्रवास केला. शुक्रवारी सायंकाळी ६:५५ च्या सुमारास बहानगर बाजार स्टेशनमधून पुढे गेल्यानंतर चेन्नईकडे जाणारी कोरोमंडल एक्स्प्रेस मुख्य मार्गाने जाण्याऐवजी चुकून एका लूप लाइनमध्ये घुसली; ज्यावर एक मालगाडी उभी होती. मात्र, अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी अधिक व्यापक तपासाची गरज असल्याचे नमूद करण्यात आले आहे. (Odisha train accident)

हेही वाचा

Back to top button