Odisha train accident | पंतप्रधान मोदी ओडिशातील रेल्वे दुर्घटनास्थळी दाखल, परिस्थितीचा घेतला आढावा | पुढारी

Odisha train accident | पंतप्रधान मोदी ओडिशातील रेल्वे दुर्घटनास्थळी दाखल, परिस्थितीचा घेतला आढावा

पुढारी ऑनलाईन डेस्क : ओडिशातील बालासोर येथील रेल्वे दुर्घटनेत २६१ जणांचा मृत्यू झाला. तर ९०० हून अधिक लोक जखमी झाले आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (दि. ३) दुपारी घटनास्थळी भेट दिली. या संपूर्ण घटनेची माहिती त्यांनी घेतली. (Odisha Train Accident)

भारतातील सर्वात भीषण रेल्वे अपघातांपैकी एक असलेल्या ओडिशाच्या बालासोर जिल्ह्यातील तिहेरी रेल्वे अपघातातील मृतांचा आकडा २६१ वर पोहोचला आहे. एकापाठोपाठ तीन रेल्वे गाड्यांची धडक होऊन हा अपघात झाला. या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर ओडिशा आणि तामिळनाडूत एक दिवसाचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. आज दुपारी पंतप्रधान मोदींनी घटनास्थळाला भेट देऊन रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आणि केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्याशी चर्चा केली. या घटनेची सविस्तर माहिती त्यांनी यावेळी घेतली. (Odisha Train Accident)

दरम्यान, बालासोर रेल्वे दुर्घटनेसंदर्भातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज उच्चस्तरीय बैठक झाली. त्यानंतर पीएम मोदी ओडिशाला रवाना झाले.

ओडिशाच्या बालासोर जिल्ह्यातील तिहेरी रेल्वे अपघातानंतरचे बचावकार्य पूर्ण झाले आहे. आम्ही या घटनेची सखोल चौकशी करू आणि भविष्यात अशा घटना घडणार नाहीत याची काळजी घेऊ, अशी माहिती केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे. ओडिशातील भीषण रेल्वे अपघातातील मृतांची संख्या २६१ वर पोहोचली असून घटनास्थळी बचावकार्य पूर्ण झाले आहे, अशी माहितीही दक्षिण पूर्व रेल्वेच्या अधिकाऱ्याने शनिवारी दिली.

हेही वाचा

 

Back to top button