Period Of Income Tax Refund : आयकर रिफंड साठीचा कालावधी १६ दिवसांपर्यंत कमी झाला; सीबीडीटी चेअरमन नितीन गुप्ता यांची माहिती | पुढारी

Period Of Income Tax Refund : आयकर रिफंड साठीचा कालावधी १६ दिवसांपर्यंत कमी झाला; सीबीडीटी चेअरमन नितीन गुप्ता यांची माहिती

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : आयकर रिफंड साठीचा सरासरी कालावधी 16 दिवसांपर्यंत कमी झाला असल्याची माहिती केंद्रीय प्रत्यक्ष कर नियंत्रण मंडळ अर्थात सीबीडीटीचे चेअरमन नितीन गुप्ता यांनी शुक्रवारी दिली. आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये जवळपास 80 टक्के रिफंड 30 दिवसांच्या आतच करण्यात आले होते, असेही त्यांनी नमूद केले. (Period Of Income Tax Refund)
आयकर परताव्यांचा (आयटीआर) निपटारा लवकरात लवकर करण्यासाठी तंत्रज्ञानाची मोठ्या प्रमाणात मदत घेतली जात आहे. शिवाय व्यवसाय सुलभता वाढावी म्हणून नागरिकांना स्वतःहून त्यांची करविषयक माहिती द्यावी, यावर सरकार काम करीत आहे. या सर्वांचा परिणाम म्हणजे रिफंड साठीचा सरासरी कालावधी आता केवळ 16 दिवसांवर आला आहे. आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये हाच कालावधी 26 दिवस इतका होता, असे नितीन गुप्ता यांनी सांगितले.
हेही वाचा

Back to top button