TCS New CEO K Krithivasan : के.कृतिवासन बनले टीसीएसचे नवे सीईओ

TCS New CEO K Krithivasan : के.कृतिवासन बनले टीसीएसचे नवे सीईओ
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतातील सर्वात मोठी सॉफ्टवेअर कंपनी टीसीएसचे (Tata Consultancy Services) नवे सीईओ के.कृतिवासन यांनी आज, शुक्रवारी (दि.६ जून) पदभार स्विकारला. माजी सीईओ राजेश गोपीनाथन यांच्याकडून कृतिवासन यांनी पदभार स्विकार केला. राजेश गोपीनाथन यांनी या वर्षाच्या सुरुवातील अचानक राजीनाम्याची घोषणा केली होती. आता ते १६ सप्टेंबर पर्यंत कंपनीसोबत सल्लागार म्हणून काम पाहतील. नवे सीईओ के. कृतिवासन हे आयआटी कानपुरचे विद्यार्थी आहेत. तसेच ते गेल्या २२ वर्षांपासून टीसीएस सोबत कार्यरत आहेत. (TCS New CEO K Krithivasan)

टीसीएसचे नवे सीईओ के. कृतिवासन यांनी कार्यभार स्विकारत कर्मचाऱ्यांसाठी एक ई-मेल लिहिला. या ई-मेलची सध्या जोरदार चर्चा होत आहे. त्यांनी आपल्या ई-मेलमध्ये आपल्या सहकारी कर्मचाऱ्यांना नव्या रोमाचंक भविष्याची पटकथा लिहिणाऱ्यावर जोर दिला आहे. (TCS New CEO K Krithivasan)

ई-मेल मध्ये के. कृतिवासन लिहितात, आपण TCS च्या पुढच्या टप्प्यात जात असताना. त्यामुळे आपल्याला क्लाउड, सायबर सुरक्षा, 5G, IoT, जनरेटिव्ह एआय यांसारख्या महत्त्वाच्या आणि उदयोन्मुख क्षेत्रांमध्ये ग्राहकांच्या सहभागावर आणि निर्दोष वितरणावर स्थिर लक्ष केंद्रित करून गुंतवणूक करणे सुरू ठेवायचे आहे."
टीसीएसचे मुख्यकार्यकारी पद स्विकारताना के. कृतिवासन यांचा उत्साह पाहण्याजोगा होता. ते ई-मेलमध्ये आपल्या कर्मचाऱ्यांसाठी पुढे म्हणतात, 'मी नजीकच्या भविष्यात या रोमांचक नवीन प्रवासाला सुरुवात करत असताना तुमच्यासोबत येण्यासाठी मी उत्सुक आहे.' ते पुढे असे म्हणतात, 'मला तुमच्यापैकी अनेकांसोबत काम करण्याची संधी मिळाली आहे आणि अनेकांसोबत चिरंतन मैत्री निर्माण झाली आहे, ज्याची मला सर्वात जास्त किंमत आहे. मला आमच्या अनेक प्रमुख ग्राहकांसोबत विविध भौगोलिक क्षेत्रांमध्ये काम करण्याची आणि ग्राहकांशी सखोल संबंध निर्माण करण्याची संधीही मिळाली आहे. या मैत्री आणि नात्याच्या बळावर मी या भूमिकेत पाऊल टाकत आहे'. (TCS New CEO K Krithivasan)

CEO म्हणून पदभार स्वीकारण्यापूर्वी, कृतिवासन टीसीएसच्या कंपनीच्या सर्वात मोठ्या वर्टिकल, BFSI चे नेतृत्व करत होते आणि डिलिव्हरी, विक्री, ग्राहक व्यवस्थापन आणि व्यवसाय व्यवस्थापन यासारख्या विविध व्यावसायिक भूमिकांमध्ये कंपनीसोबत कार्यरत होते.

गेल्या सहा वर्षांत कंपनीची वाढ झाली असली तरी विकासाचा वेग मंदावला असताना इन्फोसिस सारख्या काही स्पर्धकांनी चांगला विकास दर दाखवला आहे. त्यामुळे अशा वेळी कृतिवासन यांनी ही महत्त्वपूर्ण भूमिका स्वीकारली आहे. आता ते फर्मसाठी काय योजना आखतात ते पाहणे महत्त्वाचे ठरेल. नेतृत्त्वातील नव्या बदलामुळे गुरुवारी कंपनीचा शेअर जवळपास एक टक्क्यांनी वाढून ३,३२३ रुपयांवर स्थिरावल्याचे पहायला मिळाले.

अधिक वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news