Karnataka Cabinet Meeting : कर्नाटकात काँग्रेसने वचन पाळले; १ जुलै पासून २०० युनीट वीज मोफत | पुढारी

Karnataka Cabinet Meeting : कर्नाटकात काँग्रेसने वचन पाळले; १ जुलै पासून २०० युनीट वीज मोफत

बंगळुरु; पुढारी ऑनलाईन : कर्नाटक सरकार चालू वर्षात निवडणुकीत काँग्रेसकडून (congress) करण्यात आलेल्या पाच महत्त्वाच्या घोषणाची पुर्तता करणार असल्याची हमी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दिली. शुक्रवारी (दि.२) कॅबिनेट मंत्र्यांच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री सिद्धरामय्या (Chief Minister Siddaramaiah) माध्यमांशी बोलताना म्हणाले, आमचे सरकार निवडणुकीत दिलेल्या वचनांचे पालन करेल. त्याचा एक भाग म्हणून कर्नाटकात ‘गृहज्योती’ योजने अंतर्गत १ जुलै पासून २०० युनीट वीज मोफत देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. (Karnataka Cabinet Meeting)

राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची भारत यात्रा तसेच काँग्रेसचे संकटमोचक समजले जाणारे डी.के. शिवकुमार (Deputy Chief Minister D. K. Shivakumar) आणि सिद्धरामय्या यांच्या जोडीने कर्नाटकात काँग्रेसची एकहाती सत्ता आणली. यानंतर मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी सत्तेची सुत्रे हाती घेताच निवडणुकीत जनेतेला देण्यात आलेल्या वचनांच्या पुर्ततेचा पाठपुरवा करताना दिसत आहेत. काँग्रेसने निवडणुकीच्या घोषणापत्रात ज्या पाच महत्त्वाच्या गोष्टी जनतेला देण्याचे वचन दिले होते त्या सर्व चालू वर्षात देऊ असे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे. १ जुलै पासून २०० युनीट पर्यंत वीज मोफत देण्याची त्यांनी आज घोषणा केली. (Karnataka Cabinet Meeting)

कर्नाटक सरकारची पाच संकल्पपुर्ती (Karnataka Cabinet Meeting)

१. ‘गृहज्योती’ – २०० युनीट वीज मोफत

कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणाले की ‘गृहज्योती’ योजने अंतर्गत २०० युनीट वीज मोफत दिली जाईल. याची अंमलबजावणी १ जुलै पासून सुरु होईल. ज्या नागरिकांनी जुलैपर्यंत बील भरले नसतील त्यांना पैसे द्यावे लागतील असेही सिद्धरामय्या यांनी स्पष्ट केले.


२. ‘उचित प्रयाण’- महिलांना मोफत प्रवास

कर्नाटकात एसी आणि लक्झरी बस वगळता सार्वजनिक परिवहन बसमधून महिलांना मोफत प्रवास करता येणार आहे. मोफत प्रवास देणारी ‘उचित प्रयाण’ योजना ११ जूनपासून लागू होणार आहे.

३. ‘अन्न भाग्य’- मोफत धान्य

‘अन्न भाग्य’ योजने अंतर्गत दारिद्र्य रेषे खालील आणि अंत्योदय कार्डधारक कुटुंबाना १ जुलैपासून १० किलो धान्य मोफत दिले जाईल अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. यावेळी ते म्हणाले, मागील जेडीएस आणि काँग्रसच्या सरकारमध्ये ७ किलो धान्य दिले दिले जात होते. त्यानंतर भाजप सरकारने ५ किलो धान केले. आता, काँग्रेसच्या या सरकारमध्ये दारिद्र्य रेषे खालील कुटुंबांना १० किलो तांदूळ दिले जाईल असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

४. गृह लक्ष्मी योजना – कुटुंबातील महिला प्रमुखासाठी २००० रुपये मासिक मदत

‘गृह लक्ष्मी’ योजनेंतर्गत प्रत्येक कुटुंबातील महिला प्रमुखासाठी २,००० रुपये मासिक मदत दिली जाईल, १५ ऑगस्ट रोजी या योजनेचा प्रारंभ होईल असे सिद्धरामय्या म्हणाले. पडताळणी प्रक्रिया १५ जूनपासून सुरू होईल आणि १५ ऑगस्टपर्यंत पूर्ण होईल, त्यानंतर कुटुंबातील महिला प्रमुखांच्या खात्यावर पेमेंट सुरू होईल.

५. ‘युवा निधी’ – बेरोजगार भत्ता

‘युवा निधी’ योजनेसाठी लवकरच अर्ज जारी केला जाईल, ज्या अंतर्गत बेरोजगार पदवीधरांना (या वर्षी उत्तीर्ण झालेल्या) दरमहा रुपये ३,००० आणि बेरोजगार पदविकाधारकांना २ वर्षे किंवा त्यांना नोकरी मिळेपर्यंत १,५०० रुपये प्रति महिना दिले जातील.


अधिक वाचा :

Back to top button