पुढारी ऑनलाईन: राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) आज (दि.२६ जून) सकाळी बिहारमधील मगध झोनमध्ये छापेमारी केली. सीपीआय (माओवादी) दहशतवादी फंडिंग प्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात आनंद पासवान आरोपीला एएनआयकडून ताब्यात घेण्यात आले आहे. यापूर्वी आरोपीवर बिहारमधील विविध पोलिस ठाण्यात पाचहून अधिक गुन्हा दाखल आहेत. अशी माहिती NIA ने दिली असल्याचे वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेने दिले आहे. (CPI (Maoist) terror funding case)
मगध प्रदेशात सीपीआय (माओवादी) कॅडर आणि ओव्हर ग्राउंड वर्कर्सद्वारे (ओजीडब्ल्यू) संयुक्तपणे चालवल्या जात असलेल्या दहशतवादी वित्तपुरवठा नेटवर्क संबंधित प्रकरणातील ही चौथी अटक आहे. सीपीआय (माओवादी) ही संघटना मगध झोन क्षेत्रात स्वत:ला पुनरुज्जीवित करण्यासाठी प्रयत्न करत आहे.
गुन्हेगारी आणि हिंसक योजना पुढे नेण्यासाठी शस्त्रे आणि दारूगोळा खरेदी करण्यासाठी तसेच नवीन केडरची भरती करण्यासाठी निधी गोळा करण्याचा प्रयत्न करत आहे, अशी माहिती NIA च्या तपासातून समोर आले आहे, असे वृत्त एएनआयने दिले आहे.