Kedarnath Yatra : मुसळधार पावसामुळे केदारनाथ यात्रा स्थगित, उत्तराखंडमध्ये ऑरेंज अलर्ट | पुढारी

Kedarnath Yatra : मुसळधार पावसामुळे केदारनाथ यात्रा स्थगित, उत्तराखंडमध्ये ऑरेंज अलर्ट

पुढारी ऑनलाईन डेस्क : उत्तराखंडच्या अनेक जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरु आहे. (Kedarnath Yatra) हवामान विभागाने राज्यातली ७ जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्टदेखील जारी केलं आहे. दरम्यान, रुद्रप्रयाग जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे सोनप्रयागमध्ये केदारनाथ यात्रा पुढे ढकलण्याचा आदेश येईपर्यंत थांबवण्यात आले आहे. (Kedarnath Yatra)

पावसामुळे केदारनाथ यात्रा स्थगित करण्यात आली होती. धामसह पायी यात्रा मार्गावर प्रचंड पावसामुळे सुरक्षित ठिकाणी यात्रेकरूंना थांबवण्यात आलं आहे. सोनप्रयागमध्ये ५ हजार, गौरीकुंडमध्ये ३ हजार यात्रेकरू थांबवण्यात आले. पाऊस थांबल्यानंतर यात्रा सुरू होईल.

उत्तराखंडमधील अनेक जिल्ह्यांत रेकॉर्ड पाऊस

दिल्ली-उत्तर प्रदेशसोबतच उत्तराखंडमध्ये मान्सून पोहोचलेला आहे. येथील अनेक शहरांमध्ये मुसळधार पाऊस सुरु आहे. भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार, मागील २४ तासांच्या दरम्यान हरिद्वारमध्ये ७८ मिमी, डेहराडूनमध्ये ३२.२ मिमी, उत्तरकाशीमध्ये २७.७ मिमी पाऊस रेकॉर्ड झाला.

 

Back to top button