Ganpati Special Trains | गणेशोत्सवासाठी मध्य रेल्वेची महत्त्वाची घोषणा; उद्यापासून बुकिंग सुरू | पुढारी

Ganpati Special Trains | गणेशोत्सवासाठी मध्य रेल्वेची महत्त्वाची घोषणा; उद्यापासून बुकिंग सुरू

पुढारी ऑनलाईन डेस्क : आगामी गणेशोत्सवासाठी मध्य रेल्वेकडून प्रवाशांसाठी विशेष घोषणा करण्यात आली आहे. सप्टेंबर २०२३ च्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर १५६ विशेष रेल्वे गाड्यांची विशेष सोय करण्यात आली आहे. या रेल्वे गाड्यांसाठी मंगळवारपासून दि. २७ जूनपासून सुरू होणार आहे, अशी माहिती मध्य रेल्वेने दिली आहे.

मध्य रेल्वेने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, गणेशोत्सवादरम्यान प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेऊन सीएसएमटी, मुंबई, पनवेल आणि सावंतवाडी रोड/रत्नागिरी/पुणे/करमाळी/कुडाळ या मार्गावर विशेष गाड्या धावणार आहेत. तर, सीएसएमटी-सावंतवाडी दरम्यान दररोज ४० विशेष गांड्यांची सोय करण्यात आली आहे तसेच एलटीटी-कुडाळ-एलटीटी या मार्गावर २४ विशेष गाड्यांची सोय करण्यात आली आहे.

गणेशोत्सवासाठी बुकिंग सेवा उद्या मंगळवारपासून सर्व आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या ऑनलाईन वेबसाइटवर सुरू होईल. या विशेष गाड्यांच्या थांबण्याच्या वेळेसाठी www.enquiry ला साईटला भेट द्या. यांसदर्भातल आणखी माहितीसाठी भारतीय रेल्वेच्या Indianrail.gov.in ला साईटला भेट देऊ शकता किंवा NTES ॲप डाउनलोड करू शकता, असे देखील मध्य रेल्वेकडून सांगण्यासाठी आले आहे.

हेही वाचा:

Back to top button