Sakshi Murder Case : ४०वार आणि दगडाने ठेचून खून; साहिलला पोलिसांनी कसे पकडले? | पुढारी

Sakshi Murder Case : ४०वार आणि दगडाने ठेचून खून; साहिलला पोलिसांनी कसे पकडले?

Sakshi Murder Case : साहिलसोबत झाले होते कडाक्याचे भांडण

नवी दिल्ली, पुढारी ऑनलाईन डेस्क : येथील शाहबाद डेअरी परिसरात अल्पवयीन मुलीच्या हत्येप्रकरणात बरीच धक्कादायक माहिती समोर येत आहे. या प्रकरणातील संशयित साहिल याला पोलिसांनी बुलंदशहर येथून अटक केली आहे. साहिलने या मुलीवर चाळीसच्यावर वार करून नंतर दगडाने ठेचून हत्या केली. यासंदर्भातील एक सीसीटीव्ही व्हिडिओ ही व्हायरल झालेला आहे. मृत मुलीचे नाव साक्षी असे आहे. (Sakshi Murder Case)

Sakshi Murder Case  : वाढदिवसासाठी गेली होती

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार साहिल आणि साक्षी रिलेशनशिपमध्ये होते. पण रविवारी दोघांत भांडण झालं होतं. त्यानंतर साक्षी तिच्या मैत्रिणीच्या मुलाच्या वाढदिवसासाठी जात होती. पण साहिलने तिला रस्त्यात रोखले आणि दोघांत वाद झाला. त्यानंतर साहिलने साक्षीवर चाकूने ४०च्या वर वार केले आणि दगडाने ठेचून तिचा खून केला.

सीसीटीव्हीत चित्रण

हा सगळा घटनाक्रम सीसीटीव्हीवर चित्रित झाला आहे. हा सगळा प्रकार सुरू असताना अनेक लोक तेथून येत जात होते, पण कोणाही साहिलला थांबवण्याचा प्रयत्न केला नाही. साक्षीच्या खुनानंतर साहिलने तेथून पळ काढला. साक्षीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी गुन्हा नोंद केला असून साहिलला अटक करण्यात आली आहे.

Sakshi Murder Case : अशी झाली साहिलला अटक

या घटनेनंतर साहिलने चाकू फेकून दिला आणि बुलंदशहर येथे पलयान केले. तेथे तो मावशीच्या घरी गेला. तेथून त्याने त्याच्या वडिलांना फोन केला. पण यावेळी त्याचे वडील सर्फराज पोलिस स्टेशनमध्ये होते. पोलिसांनी या कॉलवरून साहिलचा बुलंदशहर येथील ठिकाणा शोधून काढला आणि त्याला अटक केली.

टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार साक्षीची दुसऱ्या एका मुलासोबत मैत्री होती, त्यातून दोघांत वाद सुरू झाला. त्यातून त्याने साक्षीचा खून केला. तर साक्षीच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार साक्षी गेली दहा दिवस तिच्या मैत्रिणीच्या घरी राहात होती. साक्षीच्या वडिलांनी ते साहिलला ओळखत नाहीत, अशी माहिती पोलिसांना दिली आहे. साक्षीला शिकून वकील व्हायचे होते, आणि ती दहावीची परीक्षा चांगल्या गुणांनी पास झाली होती. तर साहिल हा एसी दुरुस्तीचे काम करत होता.

हे भयंकरच – स्वाती मलिवाल

घडलेला प्रकार भयंकर असल्याची प्रतिक्रिया दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्ष स्वाती मलिवाल यांनी दिली आहे. दिल्लीत गुन्हेगारांचे धाडस किती वाढले आहे, हेच यावरून दिसते. मी माझ्या जीवनात यापेक्षा भयंकर काही पाहिलेले नाही, असे त्या म्हणाल्या.

हेही वाचा

Back to top button