Nashik Murder : जेलरोडला एकाचा घरात घुसून खून

Nashik Murder : जेलरोडला एकाचा घरात घुसून खून

Published on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

नाशिकरोड परिसरातील जेलरोड येथील दुर्गा मंदिरासमोरील घरात विळीने आणि काचेचे वार करून रहिवाशाचा खून केल्याची घटना उघडकीस आली. प्रवीण मधुकर दिवेकर (४३, रा. हेतल हाउसिंग सोसायटी, दुर्गा मंदिरासमोर, जेलरोड, नाशिकरोड) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

पोलिसांच्या प्राथमिक तपासात दिवेकर हे कौटुंबिक वादामुळे जेलरोड परिसरात राहण्यास आले होते. प्रवीण दिवेकर यांनी रविवारी (दि. २८) रात्री जेवल्यानंतर फोनवरून नातेवाइकांशी संवाद साधून ख्यालीखुशाली विचारली होती. दरम्यान, प्रवीण यांचे आई-वडिल सोमवारी (दि. 29) नाशिकला आले होते. ते प्रवीणच्या घरी गेले असता, तेथे प्रवीण रक्ताच्या थारोळ्यात पडलेले आढळले. याची माहिती मिळताच पोलिस उपआयुक्त चंद्रकांत खांडवी, सहायक पोलिस आयुक्त अंबादास भुसारे, उपनगरचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक शरमाळे तसेच गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळी जाऊन चौकशी केली.

खुनाचे कारण स्पष्ट नसल्याने पोलिसांनी तपास सुरू केला आहे. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे अज्ञात मारेकऱ्याचा शोध सुरू आहे. प्रवीण यांचा मध्यरात्री खून केल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. प्रवीण यांच्या मुलाने आत्महत्या केल्याचे पोलिस तपासात समोर येत आहे. प्रवीण यांचा खून कौटुंबिक कारणातून झाल्याचा अंदाज असून पोलिस त्यादृष्टीने तपास करीत असल्याचे पोलिस उपआयुक्त खांडवी यांनी सांगितले.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news