पुढारी ऑनलाईन डेस्क: इंडीयन इंस्टीट्युट ऑफ टेक्नाॉलॉजी (IIT) गुवाहाटीच्या वतीने संयुक्त प्रवेश परीक्षा अर्थात JEE ADVANCED चे हॉलतिकीट जारी करण्यात आले आहेत. परीक्षार्थाी हे हॉलतिकीट jeeadv.ac.in या अधिकृत संकेतस्थळावरून डाऊनलोड (Jee Advanced Admit Card) करू शकतात.
परीक्षा अवघ्या काही दिवसांवर आली असताना, या हॉलतिकीटांचं (Jee Advanced Admit Card) परिक्षार्थींसाठी विशेष महत्व आहे. जेईईची परिक्षा ४ जुन २०२३ रोजी पार पडणार आहे. पहिला पेपर सकाळी ९ ते १२ यावेळेत पार पडेल. तर दुसऱ्या पेपरसाठी २.३० ते ५.३० हि वेळ निश्चित करण्यात आली आहे.
परीक्षेसाठी (Jee Advanced Admit Card) उपस्थित राहताना हे हॉलतिकीट सोबत असणे बंधनकारक आहे. विद्यार्थ्यांनी A-4 साईझ प्रिंट सोबत बाळगावी. आयआयटी गुवाहाटीच्या वतीने सराव परिक्षादेखील आयोजित करण्यात आली आहे. याकरिता विद्यार्थी jeeadv.ac.in या संकेतस्थळावरून अधिक माहिती मिळवू शकतात.
jeeadv.ac.in या संकेतस्थळावर जा.
होम पेजवरील लिंकवर क्लिक करून लॉगइन करा.
कार्ड डाऊनलोड करून प्रिंट घ्या.
हेही वाचा