नवी दिल्ली, पुढारी ऑनलाईन : काश्मिरी फुटीरतावादी नेता यासिन मलिकला फाशीची शिक्षा देण्याची मागणी करणाऱ्या एनआयएच्या याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयात सोमवारी सुनावणी सुरू आहे. न्यायमूर्ती सिद्धार्थ मृदुल आणि न्यायमूर्ती यशवंत सिंग यांच्या खंडपीठासमोर सकाळी 10.30 वाजता सुनावणीस सुरुवात झाल्यानंतर एनआयएने वकिलांनी युक्तीवासास सुरुवात केली. यासिन मलिक सध्या यूएपीए अंतर्गत टेरर फंडिंग आणि देशाविरुद्ध युद्ध पुकारल्याप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. मे 2022 मध्ये त्याला दोषी ठरवून शिक्षा सुनावण्यात आली.