Aryan Khan WhatsApp chats : आर्यन खानआणि नवोदित अभिनेत्रीचे व्हॉटस ॲप चॅट उघड
मुंबई क्रूज ड्रग्स प्रकरणात बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याच्या जामीन अर्जावर आज विशेष न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) आर्यन खानचे व्हॉटस ॲप चॅट ( Aryan Khan WhatsApp chats ) न्यायालयात सादर केले. हे ड्रग्ज विषयी असणारे चॅट आर्यन खान आणि नवोदित अभिनेत्रीमध्ये आहे. यामुळे या प्रकरणाला वेगळे वळण लागले असून आर्यन खानच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
एनसीबीने यापूर्वीच न्यायालयात आर्यन खान हा नियमित ड्रग्जचे सेवन करत होता, असे स्पष्ट केले आहे. तसेच त्यांचे संबंध हे ड्रग्जची आतंरराष्ट्रीय तस्करी करणार्यांबरोबरही आहेत. यावेळी एनसीबीच्या वकिलांनी म्हटलं होतं की, महात्मा गांधी यांच्या देशातील तरुणाईवर ड्रग्जचा फार गंभीर परिणाम होणार आहे. मात्र यावेळी आर्यन खान यांच्या वकिलांनी आर्यन खान याच्याकडे ड्रग्ज सापडलेले नाही, त्यामुळे त्याला जामीन मिळावा, असा युक्तीवाद केला होता.
Aryan Khan WhatsApp chats : कोण आहे ती नवोदित अभिनेत्री ?
नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) आज आर्यन खानचे व्हॉटस ॲप चॅट ( Aryan Khan WhatsApp chats ) न्यायालयात सादर केले. हे चॅट एका नवोदित अभिनेत्रीबरोबरील आहे. मात्र ही नवोदित अभिनेत्री कोण, या बाबचा खुलासा अद्याप एनसीबीने केलेला नाही. आर्यन खान आणि नवोदित अभिनेत्रीमधील व्हॉटस ॲप चॅट हे ड्रग्ज विषयी होते, असा दावा एनसीबीने केला आहे.

