आप नेते सत्येंद्र जैन ऑक्सिजन सपोर्टवर | पुढारी

आप नेते सत्येंद्र जैन ऑक्सिजन सपोर्टवर

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : हवाला प्रकरणी मागील काही काळापासून तिहार कारागृहात असलेले आम आदमी पक्षाचे नेते सत्येंद्र जैन ( Satyendra Jain ) यांना लोकनायक रुग्णालयात हलविण्यात आले आहे. याठिकाणी त्यांना ऑक्सिजन सपोर्टवर ठेवण्यात आले आहे. तिहार तुरुंगात चक्कर येऊन ते पडले असल्याचे सांगितले जात आहे.

जैन यांना आधी दीनदयाळ उपाध्याय रुग्णालयात नेण्यात आले होते. तेथून त्यांना लोकनायक रुग्णालयात हलविण्यात आले असल्याचे आम आदमी पक्षाकडून सांगण्यात आले. पाठ, खांदा आणि सतत दुखत असल्याची तक्रार जैन यांनी तिहार तुरुंग प्रशासनाकडे अलीकडेच केली होती.

दरम्यान ‘देशाचा हुकूमशहा चांगल्या माणसाला मारण्याचा कसोशीचा प्रयत्न करीत आहे’ अशी टीका दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी जैन यांच्या प्रकृतीच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केली आहे. बिकट संकटाचा सामना करण्यासाठी देव त्यांना ताकत देवो, असेही केजरीवाल यांनी म्हटले आहे.

हेही वाचा : 

 

 

Back to top button