Kuno National Park: कुनोमध्ये चित्याच्या बछड्याचा मृत्यू | पुढारी

Kuno National Park: कुनोमध्ये चित्याच्या बछड्याचा मृत्यू

पुढारी ऑनलाईन डेस्क: मध्य प्रदेशातील कुनो नॅशनल पार्कमध्ये (Kuno National Park) नामिबिया आणि दक्षिण आफ्रिकेतून आणलेल्या चित्याच्या पिलाचा मंगळवारी (दि.२३) मृत्यू झाला. डिहायड्रेशन आणि अशक्तपणामुळे पिलाचा मृत्यू झाल्याचे पशुवैद्यकीय डॉक्टरांनी सांगितले. पिलावर रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, ५-१० मिनिटांनंतर त्याचा मृत्यू झाला.

एका अधिकाऱ्याने सांगितले की, कुनोमध्ये (Kuno National Park) मंगळवारी सकाळी फक्त तीन पिल्ली आईसोबत फिरत असताना दिसला. तर चौथे पिलू अशक्त असल्याचे दिसून आले. पशुवैद्यकीय पथकाने या पिल्लावर उपचार करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचा मृत्यू झाला.

दरम्यान, मध्य प्रदेशातील कुनो नॅशनल पार्कमध्ये दक्षिण आफ्रिकेतून आणलेल्या आणखी एका चित्ताचा मृत्यू झाला होता. उदय नावाचा हा चित्ता कुनो नॅशनल पार्कमध्ये आजारी आढळून आला होता. दरम्यान, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. मध्य प्रदेशचे मुख्य वनसंरक्षक जेएस चौहान यांनी त्यांच्या मृत्यूला दुजोरा दिला होता. दक्षिण आफ्रिकेतून आणल्यानंतर दोन महिन्यांत मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात चित्त्याचा हा दुसरा मृत्यू आहे. देशात आणलेल्या १२ चित्त्यांपैकी ६ वर्षांचा उदय हा एक होता. अद्याप या चित्त्याचे मृत्यूचे कारण समजू शकलेले नाही.

हेही वाचा 

Back to top button