

पुढारी ऑनलाईन डेस्क : मध्य प्रदेशातील कुनो नॅशनल पार्कमध्ये दक्षिण आफ्रिकेतून आणलेल्या आणखी एका चित्ताचा मृत्यू झाला आहे. उदय नावाचा हा चित्ता आज कुनो नॅशनल पार्कमध्ये आजारी आढळला. दरम्यान, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. मध्य प्रदेशचे मुख्य वनसंरक्षक जेएस चौहान यांनी त्यांच्या मृत्यूला दुजोरा दिला आहे. (Madhya Pradesh) दक्षिण आफ्रिकेतून आणल्यानंतर दोन महिन्यांत मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात चित्त्याचा हा दुसरा मृत्यू आहे. देशात आणलेल्या १२ चित्त्यांपैकी ६ वर्षांचा उदय हा एक होता. अद्याप या चित्त्याचे मृत्यूचे कारण समजू शकले नाही. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट होईल. (Madhya Pradesh)
मध्य प्रदेशचे मुख्य वनसंरक्षक जे.एस. चौहान यांनी सांगितले की, आज दैनंदिन निरीक्षण पथकाने उदयला (चित्ता) डोके टेकवून सुस्त अवस्थेत बसलेले पाहिले. जवळ गेल्यावर चित्ता दचकला आणि एका बाजूला मान टेकवून चालत होता. डॉक्टरांना तो प्रथमदर्शनी आजारी असल्याचे आढळून आले आणि सकाळी ११ वाजता त्याच्यावर बेशुद्धावस्थेत उपचार करण्यात आले. यानंतर त्याला आयसोलेशन वॉर्डमध्ये ठेवण्यात आले, मात्र सायंकाळी चार वाजता उदयचा मृत्यू झाला. (Madhya Pradesh)
यापूर्वी पाच वर्षांच्या नामिबियातील चित्ता साशा हिचा किडनीच्या संसर्गामुळे गेल्या महिन्यात मृत्यू झाला होता. (Madhya Pradesh) कुनो नॅशनल पार्कमध्ये धावणाऱ्या चित्यांच्या पहिल्या तुकडीचा ती एक भाग होती आणि गेल्या वर्षी नामिबियाहून आलेल्या पाच मादी चित्तांपैकी ती एक होती.