Uttarakhand : वेगवेगळ्या घटनांमध्ये झाड पडल्याने २ ठार; 3 जखमी | पुढारी

Uttarakhand : वेगवेगळ्या घटनांमध्ये झाड पडल्याने २ ठार; 3 जखमी

पुढारी ऑनलाईन डेस्क :  उत्तराखंड राज्यातील हरिद्वारमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी  जोरदार वादळामुळे झाड अंगावर पडल्याने दोघांचा मृत्यू झाला आहे. या दोघांमध्ये एका चार वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर तीनजण जखमी झाले आहेत. असे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. (Uttarakhand)

२०० वर्षांच झाड उन्माळून पडलं

 पाऊस आणि वादळामुळे ज्वालापूर परिसरात २०० वर्ष जुनं असलेल झाड उन्मळून पडल्याने अनेक लोक त्याखाली गाडले गेले. चारही जणांना वाचवण्यात आले असून त्यांना शासकीय रुग्णालयात प्राथमिक उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. दुसर्‍या घटनेत, लालजीवाला परिसरात दोन जण पडलेल्या झाडाच्या कठड्यात आले ज्यात सोनीपत येथील एका भाविकाचा मृत्यू झाला. असे पोलिस अधिकारी अजय सिंग यांनी सांगितले.

दोन्ही घटनांमधील जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये पाच जणांना येथे आणण्यात आले होते, त्यापैकी दोन जणांचा मृत्यू झाला आहे. हरमिलाप मिशन सरकारी रुग्णालयचे (हरिद्वार) डॉ अनस जाहिद  म्हणाले, एका जखमीला एम्स ऋषिकेश येथे पाठवण्यात आले आहे. तर दोन जणांवर जिल्ह्यात उपचार सुरू आहेत. जिल्हा दंडाधिकारी (डीएम) आणि वरिष्ठ पोलीस अधीक्षक (एसएसपी) घटनास्थळी पोहोचले आणि बचाव कार्याचा आढावा घेतला.

हेही वाचा 

Back to top button