रिलायन्सच्या JioMart कडून मोठी नोकरकपात, १ हजार कर्मचाऱ्यांना नारळ, जाणून घ्या कारण | पुढारी

रिलायन्सच्या JioMart कडून मोठी नोकरकपात, १ हजार कर्मचाऱ्यांना नारळ, जाणून घ्या कारण

पुढारी ऑनलाईन : मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजच्या ऑनलाइन घाऊक फॉरमॅटमधील JioMart ने सुमारे १ हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. १५ हजार मनुष्यबळांपैकी दोन तृतीयांश कर्मचारी कमी करण्याच्या फेरीचा हा एक भाग आहे. द इकॉनॉमिक टाईम्सने सूत्रांच्या हवाल्याने याबाबत वृत्त दिले आहे.

”कंपनीने गेल्या काही दिवसांत त्याच्या कॉर्पोरेट कार्यालयातील ५०० अधिकाऱ्यांसह १ हजार कर्मचाऱ्यांना राजीनामा देण्यास आहे. तसेच शेकडो कर्मचार्‍यांना आधीच परफॉर्मन्स इम्प्रूव्हमेंट प्लॅन (पीआयपी) लागू करून कामावरून कमी करण्याची योजना कंपनीने आखली आहे,” असे सुत्रानी सांगितले आहे. (Reliance JioMart)

“रिलायन्सने कर्मचाऱ्यांच्या निश्चित वेतन वेतनात कपात केल्यानंतर उर्वरित विक्री विभागातील कर्मचार्‍यांना व्हेरिएबल पे स्ट्रक्चरवर ठेवण्यात आले आहे,” असेही पुढे सांगण्यात आले आहे. रिलायन्सच्या बिझनेस-टू-बिझनेस (B2B) फॉरमॅटने किराणा स्टोअर्स व्यवसायात पारंपारिक वितरकांची जागा घेतली होती. किराणा स्टोअर्सच्या B2B मध्ये दरांत स्पर्धा वाढल्याने मार्जिनमध्ये सुधारणे करणे आणि तोटा कमी करण्याचा कंपनीचा विचार आहे.

केवळ नोकरकपात नव्हे तर JioMart त्याच्या १५० पूर्तता सेंटर्सपैकी निम्म्याहून अधिक सेंटर्स बंद करण्याचाही विचार करत आहे. जे दुकानांना किराणा सामान आणि सामान्य मालाचा पुरवठा करतात. भारतीय स्पर्धा आयोग अर्थात सीसीआयने रिलायन्स रिटेल व्हेंचर्सच्या मेट्रो कॅश अँड कॅरीच्या (Metro Cash and Carry) अधिग्रहणास मान्यता दिली आहे. डिसेंबर २०२२ मध्ये एकूण २,८५० कोटी रुपयांच्या रोख मोबदल्यात हा करार झाला होता. याचा एक भाग म्हणून रिलायन्स रिटेलला अमृतसर, अहमदाबाद, बंगळूर, दिल्ली, गाझियाबाद, गुंटूर, हैदराबाद, हुबळी, इंदूर, लखनौ, कोलकाता, मुंबई, नाशिक, सुरत, विशाखापट्टणम आणि विजयवाडा यांसारख्या शहरांमध्ये मेट्रोच्या स्टोअरचा वापर करता येईल.

 हे ही वाचा :

Back to top button