Kerala Cheriyanad Railway Station : स्टेशनवरील थांबा विसरून चक्क रेल्वे १ किलोमीटर गेली पुढे

Kerala Cheriyanad Railway Station : स्टेशनवरील थांबा विसरून चक्क रेल्वे १ किलोमीटर गेली पुढे
Published on
Updated on

तिरुअनंतपुरम; पुढारी ऑनलाईन : कल्पना करा की तुम्ही स्टेशनवर ट्रेनची वाट पाहत आहात. पण ती ट्रेन न थांबता पुढे गेली तर काय होईल. केरळमधील प्रवाशांना अशाच परिस्थितीचा सामना करावा लागला आहे. ट्रेनची अनाऊंसमेंट झाली. ट्रेनमध्ये चढण्यासाठी प्रवासी सामान घेऊन फलाटावर रांगेत उभे होते. ट्रेन पण आली पण न थांबता पुढे निघाली. यानंतर प्रवाशांमध्ये एकच घबराहट पसरली. ट्रेन जवळपास १ किलोमीटर पुढे गेली होती. जेव्हा लोको पायलटला आठवले की अरे मागील स्टेशनवर आपल्याला थांबयचे होते आणि आपण न थांबता पुढे निघून आलो आहोत. लोको पायलटला आपल्या चुकीची जाणिव झाल्यावर त्याने पुन्हा ती रेल्वे आहे तशी मागे घेतली आणि मागील स्टेशनच्या फलाटवर नेऊन लावली. (Kerala Cheriyanad Railway Station)

ही घटना केरळच्या अलाप्पुझा जिल्ह्यात घडली आहे. शोरनूरला जाणाऱ्या वेनाड एक्स्प्रेसच्या लोको पायलटने चेरियानाड नावाच्या छोट्या रेल्वे स्टेशनवरील थांबा चुकवला. तो थांबा चुकल्याचे लक्षात येताच, लोको पायलटने स्थानकावर थांबलेल्या प्रवाशांना पुन्हा रेल्वेत घेण्यासाठी ट्रेन सुमारे एक किलोमीटर मागे घेतली. ही घटना सकाळी ७.४५ च्या सुमारास चेरियानाड स्थानकावर घडली, हा थांबा मावेलिक्कारा आणि चेंगन्नूर स्थानकांदरम्यान असणारा लहान थांबा आहे. (Kerala Cheriyanad Railway Station)

आश्चर्याची बाब म्हणजे चेरियानाड रेल्वे स्थानकावर कोणत्याही प्रकारचा सिग्नल नाही. सिग्नल फक्त ब्लॉक स्थानकांवर म्हणजेच मोठ्या स्थानकांवर बसवलेले असतात किंवा चेरियानाडवर स्टेशन मास्तर देखिल नाही. पण, या स्टेशनवर या एक्सप्रेसला थांबावे लागते. पण ट्रेन एक किलोमीटर पुढे गेल्यावर पायलटला मागील स्टेशनवर थांबायचे होते याची आठवण झाली. नंतर ट्रेनला चेरियानाड रेल्वे स्थानकापर्यंत मागे घ्यावे लागले. त्यामुळे ट्रेनला वेळापत्रकानुसार ८ मिनिटे उशिर झाला, पण नंतर लोको पायलटने हा विलंब पुढील प्रवासात भरुन काढला. (Kerala Cheriyanad Railway Station)

रेल्वे अधिकाऱ्यांनी या घटनेबाबत स्पष्टीकरण दिले की, या घडलेल्या प्रकारानंतरही कोणाला काही अडचण आली नाही किंवा प्रवाशाची गैरसोय झालेली नाही. शिवाय प्रवाशांकडूनही कोणतीही तक्रार आलेली नाही. ट्रेन फलाटवर न थांबल्याने काही वेळ प्रवाशांमध्ये गोंधळ उडाला होता. पण, ट्रेन पुन्हा मागे आल्यानंतर सर्व काही सुरळीत झाले व प्रवाशांना सुद्धा दिलासा मिळाला. पण, घटलेल्या घटनेबाबत लोको पायलट कडून खुलासा व स्पष्टीकरण मागविण्यात येईल असे संबधित अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

अधिक वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news