Heat Wave : सुर्याच्या कोपाने दिल्लीकर हैरान; राजधानीतील काही भागातील तापमान ४६ अंश सेल्सियसवर | पुढारी

Heat Wave : सुर्याच्या कोपाने दिल्लीकर हैरान; राजधानीतील काही भागातील तापमान ४६ अंश सेल्सियसवर

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : राजधानी दिल्लीतील काही भागात सोमवारी ४६.२ अंश सेल्सियस तापमानाची नोंद घेण्यात आली. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील उष्णतेत वाढ झाल्याने दिल्लीकर पुरते हैराण झाले आहे. सुर्याच्या कोपामुळे दुपारच्या सुमारास रस्त्यावरील रहदारी कमी झाल्याचे दिसून आले.दरम्यान मंगळवारी उकाड्यापासून दिल्लीकरांना दिलासा मिळेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. सोमवारी नजफगढ भागात ४६.२ अंश सेल्सियस तापमानाची नोंद घेण्यात आली.

नरेला तसेच पितमपुरा भागात ४५.३ अंश सेल्सियस तर, आयानगर आणि पालम परिसरात ४४.४ अंश सेल्यिसस तापमानाची नोंद घेण्यात आली.दरम्यान हवामान तज्ञांनी मंगळवारपासून वातावरणात बदल होण्याची शक्यता वर्तवली आहे. २६ मे रोजी वादळीवाऱ्यांसह पावसाचे भाकित वर्तवण्यात आले आहे. अरबी समुद्रातून येणाऱ्या आद्रतायुक्त हवांमुळे हवामानात बदल होण्याची शक्यता असली तरी तुर्त दिल्लीसह उत्तर भारत उष्णतेच्या लाटेचा सामना करीत आहे.

Back to top button