पुढारी ऑनलाईन डेस्क : मला आणि माझ्या पत्नीला गेल्या ६ दिवसांपासून सातत्याने धमकी देण्यात येत आहेत. आमच्या दोघांच्याही सोशल मीडिया अकाऊंटरवर अश्लील मेसेज आणि धमक्या येत आहे. आमच्या दोघांच्याही जिवाला धोका आहे, असे पत्र 'एनसीबी'चे अधिकारी समीर वानखेडे ( Sameer Wankhede ) यांनी मुबईच्या पोलिस आयुक्तांना लिहिले आहे. समीर वानखेडे यांनी विशेष सुरक्षा पुरविण्याची मागणीही केली आहे.
आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात समीर वानखेडे यांची सध्या CBI चौकशी सुरू आहे. याप्रकरणात वानखेडे यांचा आर्थिक व्यवहारांमध्ये सहभाग आहे. शाहरूख खानसोबत बोलणे झाल्याचे समीर वानखेडे यांनी 'एनसीबी'पासून लपवले, असे आरोप त्यांच्यावर आहे. सध्या याप्रकरणात समीर वानखेडे यांच्या याचिकेवर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे.
कॉर्डिलिया क्रूज ड्रग्ज प्रकरणात आर्यन खान याची सुटका करण्यासाठी २५ कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप समीर वानखेडे यांच्यावर आहे. वानखेडे यांची याप्रकरणात सीबीआय चौकशी करण्यात आली आहे. यासंबंधित सीबीआयने काही ठिकाणी छापेही टाकले हाेते.