Aryan Khan Drugs Case : समीर वानखेडे सीबीआय कार्यालयात चौकशीसाठी दाखल | पुढारी

Aryan Khan Drugs Case : समीर वानखेडे सीबीआय कार्यालयात चौकशीसाठी दाखल

पुढारी ऑनलाईन डेस्क : एनसीबीचे माजी विभागीय संचालक समीर वानखेडे आर्यन खान ड्रग्ज प्रकरणी (Aryan Khan Drugs Case ) चौकशीसाठी सीबीआय कार्यालयात दाखल झाले. समीर वानखेडे आपल्या निवास्थानाहून निघताना माध्यमांनी त्यांच्याशी बातचीत केली. यावेळी समीर वानखेडे ‘सत्यमेव जयते’ असे म्हणाले. (Aryan Khan Drugs Case)

आर्यनला २ ऑक्टोबर २०२१ रोजी मुंबईत नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने टाकलेल्या छाप्यानंतर अटक करण्यात आली होती. अटकेच्या २५ दिवसांनंतर त्याला मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. सुरुवातीला या प्रकरणाचा तपास NCB मुंबईने केला होता. पण नंतर ६ नोव्हेंबर २०२१ रोजी या प्रकरणाचा तपास SIT कडे देण्यात आला होता. SIT ने या प्रकरणाचा तपास वस्तुनिष्ठ पद्धतीने केला. या प्रकरणात एकूण २० जणांवर आरोप ठेवण्यात आले होते. त्यात आर्यन खान-अरबाज मर्चंट, मुनमुन धमेचा यांचा समावेश होता. या प्रकरणी आर्यन खानला २७ मे २०२२ ला क्लिन चिट मिळाली.

दरम्यान, या कारवाईत आर्यन खान याला ठरवून टार्गेट करण्यात आले होते. तसेच एनसीबीचे माजी डायरेक्टर समीर वानखेडे यांनी आर्यन खान याचे नाव प्रसिद्धीसाठी गोवले, असा आरोपही करण्यात आला होता. तसेच याच प्रकरणी समीर वानखेडे यांनी आर्य़न खान याला ड्रग्ज प्रकरणातून सोडविण्यासाठी २५ कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप करण्यात आला आहे. हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात आले होते.

Back to top button