G7 Summit: पीएम मोदी G7 परिषदेसाठी हिरोशिमामध्ये पोहोचले | पुढारी

G7 Summit: पीएम मोदी G7 परिषदेसाठी हिरोशिमामध्ये पोहोचले

पुढारी ऑनलाईन डेस्क: पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन देशांच्या दौऱ्यावर शुक्रवारी (दि.१९) हिरोशिमा येथील G7 परिषदेत सहभागी होण्यासाठी आज सकाळी रवाना झाले होते. ते आज (दि.१९) सायंकाळच्या सुमारास G7 परिषदेचे ठिकाण असलेल्या जपानमधील हिरोशिमा येथे नुकतेच पोहचले असल्याचे वृत्त एएनआयने दिले आहे. भारताचे परराष्ट्र मंत्री डॉ. एस.जयशंकर यांनी देखील याप्रसंगाचे  फोटो (G7 Summit)  त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडेलवरून शेअर केले आहेत.

पीएम सध्या सहा दिवसांच्या विदेश दौऱ्यावर आहेत. दरम्यान जपानमधील हिरोशिमा येथे G7 देशांच्या राष्ट्र प्रमुखांची परिषद होणार आहे. या G7 परिषदेत पीएम मोदी देखील सहभागी होणार आहेत. जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा (G7 Summit) यांच्या निमंत्रणावरून जपानी अध्यक्षांच्या अंतर्गत G7 शिखर परिषदेला पंतप्रधान मोदी उपस्थित राहणार आहेत. भारताचे प्रमुख म्हणून पीएम मोदी यांच्याकडे सर्वांचेच आकर्षण असणार आहे. यानंतर ते पापुआ न्यू गिनी तसेच ऑस्ट्रेलिया या देशांनाही ते भेटी देणार आहेत.

जपान दौऱ्यादरम्यान (G7 Summit)  पीएम मोदी हे जपानचे पंतप्रधान किशिदा फुमिओ यांची भेट घेणार आहेत. जपानच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या G7 या शिखर परिषदेत मोदी विविध देशांच्या राष्ट्र प्रमुखांची भेट घेतील. शांतता, स्थिरता, समृध्दी, अन्न सुरक्षा, खत आणि उर्जा सुरक्षा, आरोग्य, लैंगिक समानता, हवामान बदल आदी मुद्यांवर पंतप्रधान G7 परिषदेत बोलणार आहेत.

ऑस्ट्रेलियातील भारतीय नागरिकांशी संवाद

दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात मोदी पापुआ न्यू गिनीला जातील. या देशाचे पंतप्रधान जेम्स मारापे यांच्यासमवेत ते भारत-पॅसिफिक द्वीपसमूह सहकार्यासाठी होणाऱ्या कार्यक्रमात सहभागी होतील. तिसऱ्या टप्प्यात मोदी 22 ते 24 मे दरम्यान ऑस्ट्रेलियाचा दौरा करतील. सिडनीमध्ये मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँटनी अल्बानीस यांची द्विपक्षीय बैठक होईल. ऑस्ट्रेलियातील भारतीय नागरिकांशीही मोदी संवाद साधणार आहेत.

हेही वाचा:

Back to top button