Youtube ads | यूट्यूब युजर्संची डोकेदुखी वाढणार?; आता ‘इतका’ वेळ जाहिरात पाहावीच लागणार | पुढारी

Youtube ads | यूट्यूब युजर्संची डोकेदुखी वाढणार?; आता 'इतका' वेळ जाहिरात पाहावीच लागणार

पुढारी ऑनलाईन डेस्क : यूट्यूब हे लोकप्रिय व्हिडिओ प्लॅटफॉर्म आहे. व्हिडिओज् पाहण्यासाठी आणि शेअर करणाऱ्यांसाठी Youtube हा गुगलचा प्लॅटफॉर्म अधिक लोकप्रिय आहे. अनेकजण आपल्या आवडीचे, कामाचे व्हिडिओ या प्लॅटफॉर्मवर पाहत असतात, परंतु अशा Youtube युजर्संसाठी एक वाईट बातमी आहे. यूट्यूबकडून प्रकाशित करण्यात आलेल्या एका ब्लॉग पोस्टमध्ये यूट्यूब पहिल्यांदाच ३० सेकंद नॉन स्किप जाहिरात सुरू करत असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म यूट्यूबवरील या नवीन बदलामुळे (Youtube ads) युजर्सची डोकेदुखी वाढणार आहे?

कंपनीने Youtube ऑफिशियल ब्लॉगमध्ये दिलेल्या माहितीत सांगितले आहे की, स्मार्ट टिव्ही आणि मोठ्या स्क्रीनवर यूट्यूब पाहणाऱ्यांना आता मोठ्या जाहिराती देखील दाखवले जाणार आहेत आणि हे स्किप देखील करता येणार नाही. कंपनी युजर्सला ३० सेकंदाची नॉन स्किप जाहिरात कंपल्सरी (Youtube ads) दाखवलीच आहे.  जाहिरात पूर्ण दाखवल्यानंतरच युजर्सला तो पाहत असलेला उर्वरित व्हिडिओ पाहता येणार आहे. सध्या यूट्यूबकडून १५ सेकंदाच्या जाहिराती दाखवल्या जातात आणि ही जाहिरात तुम्हाला पाहायची नसेल तरी, ती स्किप करून तुम्ही तुमचा व्हिडिओ पाहू शकत  होता. पण यामध्ये आता काही प्रमाणात बदल करण्यात येणार आहे, असे कंपनीने संकेत दिले आहेत.

Youtube प्रिमीयम सबस्क्रिप्शन न भरल्यास युजर्संना मोठी जाहिरात पाहायलाच लागणार आहे. त्यामुळे ही गोष्ट यूट्यूब युजर्ससाठी डोकेदुखी (Youtube ads) ठरू शकते. सध्या हा बदल केवळ अमेरिकेतील यूट्यूब युजर्ससाठी करण्यात आला आहे. हे बदल भारतासह आणखी कोणत्या देशात लागू करण्यात येतील की नाही, यासंदर्भात अद्याप कोणतीही अद्यावत माहिती कंपनीकडून देण्यात आलेली नाही. या बदलावर युजर्सकडून मिळणाऱ्या प्रतिक्रियांच्या आधारावरच कंपनी यासंदर्भात आपली पुढची ठरवणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

हेही वाचा:

Back to top button