पुढारी ऑनलाईन डेस्क : आज माझा वाढदिवस आहे. मी माझ्या कुटुंबाला भेटणार आहे. त्यानंतर मी दिल्लीला जाणार आहे. कर्नाटकमध्ये काँग्रेस पक्षालाकडे १३५ आमदार आहेत. मुख्यमंत्रीपदाचा विषय हा सर्वांनी एकमताने पक्षश्रेष्ठींकडे सोपवला आहे. याबाबत पक्षश्रेष्ठींचा निर्णय अंतिम असेल. कर्नाटकमध्ये काँग्रेसची सत्ता आणणे हे माझे उद्दिष्ट होते. हे उद्दिष्ट मी पूर्ण केले आहे, अशा शब्दांमध्ये कर्नाटक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डीके शिवकुमार ( DK Shivakumar ) यांनी आज ( दि. १५ ) आपली भूमिका माध्यमांशी बोलताना स्पष्ट केली.
२०१९ मध्ये जनता दल धर्मनिरपेक्ष आणि काँग्रेस सरकारच्या काळात जेव्हा आमच्या सर्व आमदारांनी पक्ष सोडला होता. तेव्हा मी निराश झालो नाही. मी एकटा होता. एकच धैर्यवान माणूस बहुमतात येतो, यावर माझा विश्वास आहे, असेही शिवकुमार यांनी सांगितले.
कर्नाटक मुख्यमंत्रीपदासाठी काँग्रेसमध्ये जोरदार रस्सीखेच पाहायला मिळत आहे. माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि कर्नाटक काँग्रेसचे प्रदेशामध्यक्ष डी. के. शिवकुमार यांच्यात मुख्यमंत्रीपदासाठी जोरदार रस्सीखेच सुरु आहे. दरम्यान, आज दुपारी सिद्धरामय्या पक्षश्रेष्ठींची भेट घेण्यासाठी दिल्लीला रवाना झाले आहे ( karnataka cm announcement)
हेही वाचा :