Heat Wave | देशातील 'या' भागांत १७ मे पर्यंत तीव्र उष्णतेची लाट, IMD चा इशारा | पुढारी

Heat Wave | देशातील 'या' भागांत १७ मे पर्यंत तीव्र उष्णतेची लाट, IMD चा इशारा

पुढारी ऑनलाईन डेस्क : मध्य भारतासह पूर्वेकडील भागात उष्णतेची लाट येणार आहे, असा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे. भारताच्या पूर्व भागात आजपासून (दि.१५) उष्णतेची लाट तीव्र होत असून, पुढचे दोन दिवस ही लाट कायम राहणार आहे, अशी माहिती केंद्रीय हवामान अंदाज संस्थेने नुकत्याच दिलेल्या बुलेटिनमध्ये दिली आहे.

शुक्रवारपासून (दि.१२) वायव्य भारतात उष्णतेच्या लाटेची नवीन सुरुवात झाली आहे. दरम्यान राजस्थानमध्ये कमाल तापमान ४५ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त होते. ही उष्णतेची लाट आज राजस्थानसह, पश्चिम मध्यप्रदेश आणि विदर्भात कायम राहणार असल्याचे देखील भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीत सांगितले आहे.

राज्यात उष्णतेची लाट, तापमान चाळीशीपार

 राज्यात उष्णतेची लाट आली असून बहुतांश ठिकाणी तापमान चाळीशीपार गेले आहे. त्यातच पुढील काही दिवसांमध्ये पारा आणखी वाढणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. राज्यातील तापमानाचा पारा सोमवारी दोन ते तीन अंश सेल्सिअसने वाढला आहे. आर्द्रतायुक्त आणि गरम हवेमुळे व उष्णतेमुळे अस्वस्थता जाणवणार असल्याची माहिती ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली आहे. हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार, देशातील बहुतांश भागात 40 अंशांपेक्षा जास्त तापमानाची नोंद झाली आहे.

हेही वाचा:

Back to top button