Wrestlers Protest : ‘आमचा आवाज बना’, आंदोलक महिला कुस्तीपटुंची स्मृती ईराणी, निर्मला सीतारमण यांना भावनिक साद

Wrestlers Protest : ‘आमचा आवाज बना’, आंदोलक महिला कुस्तीपटुंची स्मृती ईराणी, निर्मला सीतारमण यांना भावनिक साद

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : दिल्लीतील जंतर-मंतरवर ऑल्मपिंक वीर महिला कुस्ती पटू मागील २० दिवसांपासून आंदोलक करत आहेत. भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष तसे खासदार ब्रिजभूषण सिंह यांच्यावर लैगिंक शोषणाचा आरोप करत त्यांना अटक करावी या मागणीसाठी या महिला कुस्तीपटू आंदोलन करत आहेत. या आंदोलनाच्या काळात सत्ताधारी पक्षाच्या एका ही प्रतिनिधीने या आंदोलकांशी भेटण्याचा प्रयत्न केलेला नाही. तसेच एका ही महिला प्रतिनिधीने या आंदोलकांची भेट घेतली नाही. यामुळे या महिला कुस्तीपटुंनी केंद्रीय मंत्री स्मृती ईराणी तथा निर्मला सीतारमण यांना पत्र लिहून 'आमचा आवाज बना' अशी साद घातली आहे. (Wrestlers Protest)

भारतासाठी अभिमानास्पद कामगिरी करणाऱ्या भारतीय महिला कुस्तीपटु त्यांच्यावर झालेल्या अन्यायविरुद्ध दाद मागण्यासाठी जंतर-मंतरवर आंदोलन करत आहेत. मात्र सरकारकडून या आंदोलनाची अद्याप दखल घेण्यात आलेली नाही. महिला कुस्तीपटु आंदोलन करत असून सुद्धा सत्ताधारी एकाही महिला प्रतिनिधीने या कुस्तीपटु आंदोलकांची भेट घेतली नाही अथवा यांच्याशी संवाद साधला नाही. आंदोलनाचा पुढचा टप्पा म्हणून या आंदोलकांनी आता सत्ताधारी पक्षातील महिला प्रतिनिधींना पत्र लिहण्याचे ठरवले आहे. याच पार्श्वभूमीवर त्यांनी केंद्रीय मंत्री स्मृती ईराणी आणि अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांना साद घालत पत्र लिहले आहे. (Wrestlers Protest)

मंत्री स्मृती ईराणी आणि निर्मला सीतारमण यांना लिहलेल्या पत्रात पीडित महिला कुस्तीपटु म्हणतात, 'आज आम्हाला इथे आंदोलनाला बसून २२ दिवस झाले पण आजपर्यंत भाजपची एकही महिला खासदार इथे येऊन आमच्यासोबत बसलेली नाही. मुलींच्या सन्मानासाठी आम्ही लढत आहोत. तुम्ही बेटी वाचवा, बेटी शिकवा आणि महिलांच्या सन्मानाबाबत बोलता, मग आम्हीही याच समाजातील आहोत आणि आम्ही तुमच्या मुली आहोत, आम्हीही आमच्या सन्मानासाठी लढत आहोत, त्यामुळे तुम्ही आमच्या समर्थनात यावे. आम्हाला तुमच्याकडून खूप अशा आणि अपेक्षा आहेत. तम्ही आमचा आवाज बनावा आणि आमच्या चारित्र्य आणि सन्मानाची रक्षा करावी. (Wrestlers Protest)

यावेळी विनेश फोगट यांनी सांगितले की, आता आम्ही भाजपच्या सर्व महिला खासदारांना हाताने पत्र लिहून आमच्या समर्थनात यावे, असे सांगणार आहोत. आमच्या सहकारी महिला खासदारही हाताने पत्र देतील आणि आम्ही त्यांनाही हे पत्र ई-मेलद्वारे पाठवू. सोमवारपासून कुस्तीपटू वैयक्तिकरित्या किंवा ई-मेलद्वारे हे पत्र सत्ताधारी पक्षाला पाठवतील आणि त्यांना आंदोलनात सहभागी होण्याचे निमंत्रण देतील.


अधिक वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news