Brahmos Supersonic Cruise Missile : नौदलाकडून बह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

Brahmos Supersonic Cruise Missile : नौदलाकडून बह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी
Published on
Updated on

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्राची भारतीय नौदलाने रविवारी (दि.१४) यशस्वी चाचणी घेतली. आयएनएस मार्मागोवा या युद्धनौकेवरुन या क्षेपणास्त्राची चाचणी घेण्यात आली. या क्षेपणास्त्राच्या चाचणीतून नौदलाची समुद्रातील मारक क्षमता आणि ताकद आणखी वाढली आहे. भारतीय नौदलातील आयएनएस मार्मागोवा या नव्या युद्धनौकेवरून रविवारी ब्रह्मोस क्षेपणास्त्राची चाचणी घेण्यात आली. हल्लेखोर क्षेपणास्त्राचा ब्रह्मोस क्षेपणास्त्राने अचूक वेध घेतला आणि ते हवेतच नष्ट केले. (Brahmos Supersonic Cruise Missile)

याबाबत नौसेनेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, नव्या क्षेपणास्त्र विध्वसंक मार्मागोवा युद्धनौकेने ब्रह्मोस सुपरसोनिक क्रूझ क्षेपणास्त्राने परिक्षणाच्या दरम्यान यशस्वीरित्या लक्ष भेदले. आयएनएसचे मार्मागोवा हे दुसरी अशी युद्धनौका आहे, जी लेटेस्ट गाईडेड मिसाईल डिस्ट्रॉईड आहे (Latest Guided-Missile Destroyer). भारतीय नौदलाच्या युद्धनौका रचना विभागाने आयएनएस मार्मागोवाची रचना केली आहे.गोव्यातील पोर्ट सिटी मुरगाववरून या युद्धनौकेचे नामकरण करण्यात आले आहे. गोवा मुक्तीदिनाच्या पूर्वसंध्येला 18 डिसेंबर 2022 रोजी ती नौदलात दाखल झाली. गोवा 60 वा स्वातंत्र्यदिन साजरा करत असताना या युद्धनौकेने आपला पहिला प्रवास केला.

शस्त्रास्त्र प्रणालींमध्ये स्वयंपूर्णता (Brahmos Supersonic Cruise Missile)

नौदलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, "स्वदेशी बनावटीचे जहाज आणि तिची शस्त्र प्रणाली हे स्वावलंबन आणि समुद्रातील नौदल सामर्थ्याचे आणखी एक ज्वलंत उदाहरण आहे." तथापि, क्षेपणास्त्र चाचणीचे ठिकाण अद्याप स्पष्ट झालेले नाही. ब्रह्मोस एरोस्पेस प्रायव्हेट लिमिटेड हा एक इंडो-रशियन संयुक्त उपक्रम आहे, जो सुपरसोनिक क्रूझ क्षेपणास्त्रे तयार करतो. हे क्षेपणास्त्र पाणबुडी, जहाज आणि विमान किंवा जमिनीवरील 'प्लॅटफॉर्म'वरून डागले जाऊ शकते. भारतातील ब्रह्मपुत्रा नदी आणि रशियाच्या मॉस्क्वा नदीवरून हे नाव देण्यात आले आहे.

ब्रह्मोस क्षेपणास्त्राची मारक क्षमता २९० किमी आहे आणि हे जगातील सर्वात वेगवान क्रूझ क्षेपणास्त्र आहे. ज्याचा वेग मॅक २.८ आहे (ध्वनी वेगाच्या जवळपास तिप्पट). खराब हवामान असतानाही हे क्षेपणास्त्र रात्रंदिवस काम करू शकते. हे "फायर अँड फरगॉट" या तत्त्वावर कार्य करते म्हणजेच मिसाईल लॉन्च केल्यानंतर याला मार्गदर्शनाची आवश्यकता नसते. भारत ब्रह्मोस क्षेपणास्त्रांची निर्यातही करत आहे. गेल्या वर्षी जानेवारीमध्ये, भारताने क्षेपणास्त्राच्या तीन बॅटरी पुरवण्यासाठी फिलिपाइन्ससोबत ३७.५ कोटी डॉलरचा करार केला होता.

मोर्मुगाओ म्हणजे गोवागौरव

  • भारतीय नौदलाच्या युद्धनौका रचना विभागाने आयएनएस मार्मागोवाची रचना केली आहे.
  • गोव्यातील पोर्ट सिटी मुरगाववरून या युद्धनौकेचे नामकरण करण्यात आले आहे.
  • गोवा मुक्तीदिनाच्या पूर्वसंध्येला 18 डिसेंबर 2022 रोजी ती नौदलात दाखल झाली.
  • गोवा 60 वा स्वातंत्र्यदिन साजरा करत असताना या युद्धनौकेने आपला पहिला प्रवास केला.

हेही जाणून घ्या…

  • 163 मीटर व रुंदी 17 मीटर असलेली ही युद्धनौका भारतातील आजवरची सर्वाधिक शक्तिशाली युद्धनौका.
  • 75 टक्के स्वदेशी बनावटीची ही युद्धनौका असून, अशा आणखी 4 युद्धनौका तयार केल्या जात आहेत.

ब्रह्मोसवर एक नजर…

  • हे सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र आहे. ते पाणबुडी, जहाज, विमान किंवा जमिनीवरून डागता येते.
  • जमिनीवरून किंवा समुद्रातून डागल्यानंतर ब्रह्मोस तासी 2500 कि.मी. वेगाने टार्गेट उद्ध्वस्त करू शकते.
  • ब्रह्मोस क्षेपणास्त्र पाणबुडीतून 40-50 मीटर खोलवरून डागता येते.


अधिक वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news