नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : कर्नाटक विधानसभा निवडणुकीतील भाजपच्या पराभवानंतर देशातील विरोधी पक्ष सक्रिय झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर शिवसेना (युबीटी) नेते आदित्य ठाकरे यांनी आज (दि.१४) 'आप' नेते व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली. राजकीय मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती केजरीवाल यांनी दिली. (Thackeray And Kejriwal )