कर्नाटक मुख्‍यमंत्री निवड : सुशीलकुमार शिंदे बंगळूरला रवाना, पक्षश्रेष्‍ठींना देणार अहवाल | पुढारी

कर्नाटक मुख्‍यमंत्री निवड : सुशीलकुमार शिंदे बंगळूरला रवाना, पक्षश्रेष्‍ठींना देणार अहवाल

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : कर्नाटक विधानसभा निवडणुकीमध्‍ये काँग्रेसने पूर्ण बहुमत मिळवले आहे. यानंतर कोणताही धोका नको यासाठी सर्व आमदारांना बंगळूर येथे हलविण्‍यात आले आहे. आता राज्याचा पुढील मुख्यमंत्री कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यावरून काँग्रेसमध्‍ये खलबते सुरु झाली आहे. दरम्‍यान, मुख्‍यमंत्रीपदी कोणाची निवड यासाठी आज बंगळूरु येथे आज (दि.१४) काँग्रेस विधिमंडळ पक्षाची ( सीएलपी ) बैठक होणार आहे. माजी केद्रीय मंत्री व काँग्रेसचे ज्‍येष्‍ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांच्‍यासह दीपक बावरिया आणि भंवर जितेंद्र सिंग यांची कर्नाटकातील अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने कर्नाटक पक्ष निरीक्षक  म्हणून नियुक्ती केली आहे.

पक्ष निरीक्षक आपला अहवाल पक्षश्रेष्‍ठींना सादर करणार

आज बंगळूर येथे काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्‍या बैठकीला पक्ष निरीक्षक म्‍हणून सुशीलकुमार शिंदे, दीपक बावरिया आणि भंवर जितेंद्र सिंग उपस्‍थित राहणार आहेत. हे तिन्ही नेते आज सायंकाळी होणाऱ्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीला उपस्थित राहणार असून, त्यानंतर ते आपला अहवाल हायकमांडला सादर करणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.

 बैठकीनंतर पक्षश्रेष्‍ठी घेतील निर्णय : मल्‍लिकार्जून खर्गे

काँग्रेस पक्षाचे पर्यवेक्षक बंगळूरला गेले आहेत. येथे आज (दि.१४) सायंकाळी काँग्रेस विधिमंडळ पक्षाची ( सीएलपी ) बैठक होईल. या बैठकीनंतर पक्ष निरीक्षक या बैठकीत मांडली गेलेली मते पक्ष श्रेष्‍ठींना सांगतील. त्‍यानंतर पक्षश्रेष्‍ठी (हायकमांड) कर्नाटकचे मुख्‍यमंत्री कोण होणार याबाबत निर्णय देतील, अशी माहिती काँग्रेसचे अध्‍यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी आज ( दि. १४ ) माध्‍यमांशी बोलताना दिली.

हेही वाचा : 

 

 

Back to top button