Cyclone Mocha Update: ‘मोचा’ बांगलादेशच्या किनारपट्टीला धडकले, काही भागात प्रचंड नुकसान

Cyclone Mocha Update
Cyclone Mocha Update

पुढारी ऑनलाईन : 'मोचा' चक्रीवादळ आज (दि.१४) दुपारी तीनच्या सुमारास कॉक्सबाजार आणि उत्तर म्यानमार किनारपट्टीजवळ बांगलादेशात धडकले. या वादळामुळे किनारपट्टीच्या भागाला मुसळधार पावसाने झोडपले. वाऱ्याचा वेग २०० ते २१० किमी प्रतितास इतका होता. किनारपट्टीवरील झाडे उन्मळून पडली आहेत. काही भागात प्रचंड नुकसान झाले असल्याचे वृत्त 'ढाका ट्रिब्युन'ने दिले आहे.

'मोचा' चक्रीवादळ आज दुपारी बांगलादेशच्या किनारपट्टीला धडकले. आता पुढे हे चक्रीवादळ म्यानमारला धडकेल आणि दक्षिणेकडे सरकेल. मोचा चक्रीवादळामुळे म्यानमारमधील रान्कीन या राज्याची राजधानी सित्तवेमध्ये मोठ्या प्रमाणात विध्वंस पाहायला मिळाला आहे. दरम्यान, वादळामुळे बांग्लादेशमधील टेकनाफ, सेंट मार्टिन इस्लाम येथे जोरदार वाऱ्यासह पाऊस पडत आहे. यामुळे किनापट्टीलगतच्या भागात मोठे नुकसान झाल्याची शक्यता आपत्ती व्यवस्थापनाकडून वर्तवली जात आहे.

Cyclone Mocha Update: 2 LNG टर्मिनल्सचे नुकसान

मोचा चक्रीवादळामुळे दोन फ्लोटिंग एलएनजी टर्मिनल्सचा गॅस पुरवठा बंद झाला आहे. दोन दिवसांत गॅसचा पुरवठा सुधारेल, मात्र तो पूर्वपदावर येण्यासाठी 10-12 दिवस लागतील, असे बांगलादेशचे ऊर्जा आणि खनिज संसाधन राज्यमंत्री नसरुल हमीद यांनी सांगितले.

'मोचा' दोन दशकांतील सर्वात शक्तिशाली चक्रीवादळ

चक्रीवादळ मोचा हे जवळपास दोन दशकांत बांगलादेशच्या किनारपट्टीवर धडकणारं सर्वात शक्तिशाली चक्रीवादळ  ठरणार आहे, अशी माहिती 'पीटीआय' वृत्तसंस्थेने दिली आहे. बांगलादेशच्या हवामान विभागाचे प्रमुख अजीजुर रहमान यांनी 'एएफपी'ला सांगितले की, "चक्रीवादळ मोचा हे चक्रीवादळ 'सिद्र' या चक्रीवादळानंतरचे सर्वात शक्तिशाली वादळ आहे."

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news