‘Mocha’ cyclone: ‘मोचा’ चक्रीवादळच्या पार्श्वभूमीवर पं. बंगालच्या बख्खली किनारपट्टीवर संरक्षण पथके तैनात | पुढारी

'Mocha' cyclone: 'मोचा' चक्रीवादळच्या पार्श्वभूमीवर पं. बंगालच्या बख्खली किनारपट्टीवर संरक्षण पथके तैनात

पुढारी ऑनलाईन डेस्क : पश्चिम बंगाल समुद्रातील मोचा चक्रीवादळाने तीव्र रूप धारण केले आहे. दरम्यान, येथील आपत्ती व्यवस्थापन आणि प्रशासनाने हे चक्रीवादळ अत्यंत तीव्र होत असल्याच्या सूचना शनिवारी (दि.१३) दिल्या होत्या. हे चक्रीवादळ पुढे म्यानमारच्या दिशेने सरकत असून, पश्चिम बंगालच्या किनारपट्टीला धोका पोहोचण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालच्या दक्षिण २४ परगणा बख्खली किनारपट्टीवर (‘Mocha’ cyclone) संरक्षण पथके तैनात करण्यात आली आहेत.

पश्चिम बंगाल उपसागराच्या दक्षिणेकडील बक्खली किनारपट्टीवर संरक्षण दलाकडून खबरदारी बाळगली जात आहे. नागरी संरक्षण दलाचे सदस्य जनतेला आणि पर्यटकांना सतत सावध करत आहेत आणि त्यांना सतर्क राहण्यास सांगत आहेत. सुरक्षा दलाच्या जवानांकडून समुद्रकिनाऱ्यावर आणि समुद्राच्या जवळच्या भागात येण्याचे टाळण्यास (‘Mocha’ cyclone) सांगितले जात आहे. ‘मोचा’ चक्रीवादळ तीव्र होण्याचा इशारा दिल्यानंतर राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनाने (NDRF) पश्चिम बंगालच्या दिघामध्ये ८ टीम आणि २०० बचावकर्ते तैनात केले आहेत.

चक्रीवादळ गेल्या 6 तासांत 15 कि.मी. प्रतितास वेगाने पुढे सरकत असून, 14 मे रोजी ते दुपारी बांगलादेशातील कॉक्स बाजार आणि म्यानमारमधील क्युकप्यू भाग ओलांडेल (‘Mocha’ cyclone), अशी शक्यता आहे. वार्‍याचा वेग या दरम्यान ताशी 150-160 कि.मी. प्रतितास ते 175 कि.मी. पर्यंत असू शकतो, असे भारतीय हवामान विभागाने सांगितले.

‘Mocha’ cyclone: ‘मोचा’चा रोहिंग्या छावणीला धोका; WOM चा इशारा

मोचा चक्रीवादळाचा फटका रविवारी बांगलादेश-म्यानमार सीमेवर असलेल्या रोहिंग्या मुस्लिमांच्या जगातील सर्वात मोठ्या छावणीला बसू शकतो. वर्ल्ड मेट्रोलॉजिकल ऑर्गनायझेशनने (WMO-World Meteorological Organization)हा इशारा दिला आहे. पूर किंवा भूस्खलन झाल्यास मोठी हानी शक्य आहे. निर्वासित छावणीत सुमारे 8 लाख 80 हजार रोहिंग्या मुस्लिम राहत असल्याचे देखील वर्ल्ड मेट्रोलॉजिकल ऑर्गनायझेशनने दिलेल्या माहितीत स्पष्ट केले आहे.

हेही वाचा:

Back to top button