Cyclone Mocha | मोचा बनले अतिशय तीव्र चक्रीवादळ, ‘या’ राज्यांत मुसळधारेचा इशारा, हवामान विभागाकडून अलर्ट जारी | पुढारी

Cyclone Mocha | मोचा बनले अतिशय तीव्र चक्रीवादळ, 'या' राज्यांत मुसळधारेचा इशारा, हवामान विभागाकडून अलर्ट जारी

पुढारी ऑनलाईन : मोचा चक्रीवादळ‍ाचे (Cyclone Mocha) अतिशय तीव्र चक्रीवादळात रुपांतर झाले आहे. हे चक्रीवादळ आज १२ मे रोजी सकाळी ५.३० वाजता मध्य दक्षिणपूर्व बंगालच्या उपसागरात पोर्ट ब्लेअरच्या पश्चिम-वायव्येस सुमारे ५२० किमी अंतरावर घोंघावत होते, अशी माहिती भारतीय हवामान विभागाने दिली आहे. या चक्रीवादळामुळे पूर्वेकडील अनेक राज्यांत आणि अंदमान-निकोबारमध्ये जोरदार ते मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर एनडीआरएफच्या पथकांना सतर्क करण्यात आले आहे. आम्ही आठ पथके तैनात केली आहेत. एनडीआरएफच्या २०० कर्मचाऱ्यांना बचाव कार्यासाठी सज्ज ठेवण्यात आले आहे. (Cyclone Mocha)

मोचा चक्रीवादळ उत्तर-ईशान्येकडे सरकण्याची आणि पूर्वमध्य बंगालच्या उपसागरात आणखी तीव्र होण्याची अधिक शक्यता आहे. ते बांगला देशचा आग्नेय भाग आणि म्यानमारचा उत्तरेकडील किनारपट्टीवरून जाण्याची शक्यता आहे. अतिशय उग्र रुप धारण केलेल्या या चक्रीवादळामुळे ताशी १५०-१६० किमी ते १७५ वारे वाहू शकते, असे हवामान विभागाने म्हटले आहे. (mocha cyclone)

या चक्रीवादळामुळे अंदमान आणि निकोबारच्या काही भागात मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. त्रिपुरा आणि मिझोरामच्या बहुतांश भागांत १३ मे रोजी जोरदार आणि १४ मे रोजी मुसळधार पावसाची शक्यता आहे. नागालँड, मणिपूर आणि आसामच्या दक्षिण भागात १४ मे रोजी जोरदार पाऊस पडणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. (cyclone mocha affected states)

पुढील दोन दिवसांत दक्षिणपूर्व बंगालचा उपसागर, अंदमानचा समुद्र खवळलेला असेल. मच्छिमार, जहाजे, बोटी आणि मच्छीमार ट्रॉलर यांनी आग्नेय बंगालच्या उपसागरात १२ मे पर्यंत आणि मध्य बंगालच्या उपसागरात आणि उत्तर अंदमान समुद्रात १४ मे पर्यंत जाऊ नये असा सल्ला देण्यात आला आहे.

हे ही वाचा :

Back to top button