Friend In Cockpit : गर्लफ्रेंडला विमानाच्या कॉकपीटमध्ये बोलवणे एअर इंडियाच्या पायलटला पडले महागात

Friend In Cockpit : गर्लफ्रेंडला विमानाच्या कॉकपीटमध्ये बोलवणे एअर इंडियाच्या पायलटला पडले महागात

मुंबई; पुढारी ऑनलाईन : दुबईहून मुंबईला येणाऱ्या विमानातील पायलटने आपल्या गर्लफ्रेंडला कॉकपीटमध्ये बोलवले. दोघे खूपवेळ तेथेच बोलत बसले. पायलटने क्रू मेंबर्सकडून गर्लफ्रेंडसाठी दारु मागवली. क्रू मेंबर्सनी यावर आपत्ती दर्शवल्यावर सहकाऱ्यांवर भडक पायलटने असभ्य वर्तन केले. हा सगळा प्रकार एअर इंडियाच्या विमानात २७ फ्रेब्रुवारीला घडला आहे. पायलट त्याच्या या वर्तनामुळे चांगलाच गोत्यात आला आहे. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) तीन महिन्यांसाठी पायलटचे लायसन्स रद्द केले असून एअर इंडियाला ३० हजारांचा दंड सुद्धा ठोठावला आहे. (Friend In Cockpit)

या प्रकरणी एअर इंडियाने सांगितले की, आम्ही तक्रार गांभीर्याने घेतली आहे. AIR India देखील या प्रकरणी चौकशी करत आहे. इतकेच नाही तर आम्ही या प्रकरणाची माहिती डीजीसीएला दिली आहे आणि त्यांच्या तपासात सहकार्य करत आहोत. आमच्या प्रवाशांच्या सुरक्षेशी आणि सुविधेशी खेळणे आम्ही सहन करणार नाही. तपासात दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई केली जाईल. (Friend In Cockpit)

याच वर्षी जानेवारी महिन्यात स्पाईस जेटच्या दिल्ली-हैदराबादच्या फ्लाइटमध्ये महिला क्रू मेंबरसोबत गैरवर्तन केल्याची घटना समोर आली होती. स्पाईस जेट सिक्युरिटीने पोलिसांत तक्रार केली होती. याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी गुन्हाही दाखल केला होता. पोलिसांनी आरोपी अबसार आलम याला अटक केली होती. स्पाइसजेटने ही घटना 23 जानेवारीची असल्याचे सांगितले होते. स्पाइसजेटचे वेट-लीज्ड कोरेंडन फ्लाइट (SG-8133) दिल्लीहून हैदराबादला जात होते. दिल्लीत बोर्डिंग दरम्यान एका प्रवाशाने अयोग्य वर्तन केले. या प्रकरणी क्रू मेंबर्सनी पीआयसी आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांना माहिती दिली. प्रवासी आणि त्याच्या साथीदाराला उतरवून सुरक्षा पथकाच्या ताब्यात देण्यात आले.


अधिक वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news