Gyanvapi Mosque Case : ज्ञानवापी मशिदीत सापडलेल्या ‘शिवलिंग’प्रकरणी अलाहाबाद हायकोर्टाचा मोठा निर्णय! पुरातत्व विभागाला दिले वैज्ञानिक सर्वेक्षणाचे निर्देश

Gyanvapi Mosque Case : ज्ञानवापी मशिदीत सापडलेल्या ‘शिवलिंग’प्रकरणी अलाहाबाद हायकोर्टाचा मोठा निर्णय! पुरातत्व विभागाला दिले वैज्ञानिक सर्वेक्षणाचे निर्देश

प्रयागराज, पुढारी वृत्तसेवा : ज्ञानवापी मशिदीत सापडलेल्या कथित शिवलिंग प्रकरणी अलाहाबाद कोर्टाने शुक्रवारी महत्त्वपूर्ण निर्णय दिला. या शिवलिंगाचे कार्बन डेटिंग करण्याचे आदेश भारतीय पुरात्तव सर्वेक्षण विभागाला न्यायालयाने दिले आहेत. जिल्हा न्यायालायने कार्बन डेटिंग करण्याची मागणी करणारी याचिका फेटाळून लावली होती. मात्र, उच्च न्यायालयाने जिल्हा न्यायालयाचा आदेश रद्द केला आहे.

वाराणसी येथील ज्ञानवापी मशिदीमध्ये शिवलिंग आढळल्याचा दावा करण्यात आला होता. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने शिवलिंग सापडेलली जागा सुरक्षित ठेवण्याचे आदेश दिले होते. परंतु, मुस्लिम पक्षाने मशिदीत शिवलिंग सापडले असल्याचा दावा फेटाळून लावला होता. हे शिवलिंग नसून केवळ कारंजे असल्याचा दावा करण्यात आला होता. सुरुवातीला हे प्रकरण दिवाणी न्यायालयात होते. परंतु, प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन दिवाणी न्यायालयातून हे प्रकरण जिल्हा न्यायालयात गेले.

दरम्यान, ज्ञानवापी मशिदीमध्ये सापडलेल्या 'शिवलिंग'चा काळ कार्बन डेटिंग पद्धतीने शोधण्याची मागणी चार हिंदू महिलांनी याचिकेद्वारे जिल्हा न्यायालयात केली होती. मात्र, वाराणसी जिल्हा न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली. जिल्हा न्यायालयाच्या या निर्णयाला अलाहाबाद हायकोर्टात आव्हान देण्यात आले. हायकोर्टानेने जिल्हा न्यायालयाचा आदेश रद्द करत कार्बन डेटिंग करण्यास परवानगी दिली आहे. शिवलिंगची अखंडित वैज्ञानिक चाचणी करावी, असे आदेश अलाहाबाद हायकोर्टाने भारतीय पुरात्तव सर्वेक्षण विभागाला दिले आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news