Bomb threat e-mail: दिल्लीतील शाळेला पुन्हा एकदा बॉम्बच्या धमकीचा ईमेल | पुढारी

Bomb threat e-mail: दिल्लीतील शाळेला पुन्हा एकदा बॉम्बच्या धमकीचा ईमेल

पुढारी ऑनलाईन: दिल्लीतील डीपीएस मथुरा रोडवरील शाळेला पुन्हा एकदा बॉम्बच्या धमकीचा ई-मेल प्राप्त झाल्याची माहिती काल (दि.११) मिळाली. यानंतर दिल्ली पोलिस आणि बॉम्बशोधक पथक तत्काळ घटनास्थळी पोहचले. शोधमोहिमेनंतर हा बॉम्बच्या धमकीचा ईमेल (Bomb threat e-mail) एका विद्यार्थ्याने पाठवल्याचे तपासातून निष्पन्न झाले होते.

दिल्लीतील शाळेला पुन्हा दुसऱ्यांदा धमकीचा ईमेल (Bomb threat e-mail)  मिळाला. यानंतर दिल्ली पोलिसांनी श्वानपदके, २ बॉम्ब निकामी पथके आणि स्थानिक कर्मचार्‍यांसह शोध घेण्यात आला परंतु काहीही संशयास्पद आढळले नाही. हा एक फसवा कॉल असल्याचे तपासातून स्पष्ट झाले आहे. पुढील तपास सुरू असल्याची माहिती दक्षिण दिल्लीचे डीसीपी राजेश देव यांनी दिली आहे.

Bomb threat e-mail: यापूर्वी देखील शाळेला धमकीचा ईमेल

दिल्लीतील मथुरा रोडवरील दिल्ली पब्लिक स्कूलला २६ एप्रिलच्या सकाळी ई-मेलद्वारे बॉम्बची धमकी मिळाली होती. धमकीनंतर शाळा मोकळी करण्यात आल्यानंतर शाळेच्या परिसराची झडती घेण्यात आली. मात्र यावेळी पोलिसांना परिसरात कोणतीही संशयास्पद गोष्ट सापडलेली नव्हती.

हेही वाचा:

Back to top button