Sachin Pilot’s Jan Sangharsh Yatra : गेहलोत सरकार विरुद्ध सचिन पायलट यांच्या ‘जन संघर्ष’ यात्रेस सुरुवात | पुढारी

Sachin Pilot’s Jan Sangharsh Yatra : गेहलोत सरकार विरुद्ध सचिन पायलट यांच्या ‘जन संघर्ष’ यात्रेस सुरुवात

जयपूर; पुढारी ऑनलाईन : राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट (Sachin Pilot) यांनी गुरुवारी, ११ मे रोजी अजमेर येथील अशोक उद्यानातून भ्रष्टाचाराविरोधात (issues of corruption and paper leaks) जनसंघर्ष यात्रेला (Jan Sangharsh Yatra) सुरुवात केली. पायलट यांच्या या यात्रेकडे थेट मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Ashok Gehlot government) आणि त्यांच्या सरकारला आव्हान म्हणून पाहिले जात आहे. गेहलोत यांच्याविरोधात आघाडी उघडताना पायलट यांनी दोन दिवसांपूर्वी या यात्रेची घोषणा केली होती. तत्पूर्वी, 7 मे रोजी मुख्यमंत्री गेहलोत (Chief Minister Ashok Gehlot) यांनी धौलपूर येथील सभेत भाजप नेते आणि पायलट यांच्यावर हल्लाबोल करताना म्हटले होते की, कोरोनानंतर आपल्या राज्यात आणखी एक संकट आले आहे. (Sachin Pilot’s Jan Sangharsh Yatra)

“पेपर फुटल्याने तरुणांच्या भविष्याशी खेळ” (Sachin Pilot’s Jan Sangharsh Yatra)

मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, धर्मेंद्र प्रधान आणि गजेंद्र सिंह शेखावत यांनी राज्य सरकार पाडण्याचा कट रचला होता. या लोकांनी राजस्थानमध्ये पैसे वाटले. मात्र, आता ते पैसे परत घेत नाहीत. मला काळजी वाटते की हे लोक पैसे का घेत नाहीत. मी माझ्या आमदाराला हे सुद्धा सांगितले की जितका पैसा घेतला आहे त्यापैकी काही खर्चही झाला असेल. तर खर्च केलेले पैसे परत देईन किंवा पक्षाच्या हायकमांडकडून मिळवून देईन. गेहलोत यांच्या वक्तव्यानंतर माजी उपमुख्यमंत्र्यांनी यात्रा काढण्याची घोषणा केली होती.

सचिन पायलट यांनी यात्रा सुरू करताना सांगितले की, राज्यात पेपर लीक करुन तरुणांच्या भविष्याशी खेळ केला जात आहे. याबाबत मी विचारणा केली असता यात कोणताही नेता किंवा अधिकारी सहभागी नसल्याचे सांगण्यात आले. यावेळी एका आरपीएससी सदस्याला अटक करण्यात आली. पण त्याच्या तारा कुठेतरी जोडल्या आहेत का? पायलट पुढे म्हणाले की, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष असताना मी राज्य सरकारवर आरोप केले, आमच्या पक्षाच्या सर्व नेत्यांनीही आरोप केले. (Sachin Pilot’s Jan Sangharsh Yatra)

Sachin Pilot’s Jan Sangharsh Yatra

आम्ही वसुंधरा सरकारलाही दिले होते आव्हान

पायलट म्हणाले की, वसुंधरा राजे यांच्या कार्यकाळात सातत्याने भ्रष्टाचार होत होता. आम्ही वसुंधरा यांना आव्हान दिले. तुमच्याकडे बहुमत असेल, तुमची सत्ता असेल, पण तुमच्याकडे जनतेला लुटण्याचा परवाना नाही. आता या सर्व प्रकरणावर मौन बाळगणे हे जनतेच्या हिताचे नाही. पायलट यांच्या यात्रेच्या बॅनर आणि पोस्टरमध्ये फक्त सोनिया गांधींचा फोटो लावण्यात आला आहे आणि राहुल गांधी आणि प्रियांकाही यांनाही गायब करण्यात आले आहे.

पायलट यांच्या जनसंघर्ष यात्रेसाठी केंद्र सरकारकडून विशेष सुरक्षेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. माजी उपमुख्यमंत्री पायलट यांना यापूर्वीच केंद्र सरकारकडून ‘वाय’ श्रेणीतील सीआरपीएफची सुरक्षा मिळाली आहे. आयजी सीआरपीएफच्या वतीने 10 मे रोजी राजस्थान सरकार, राजस्थान पोलिस डीजीपी आणि उच्च पोलिस अधिकाऱ्यांना लिहिलेल्या पत्रात सचिन पायलटच्या सुरक्षेबाबत सीआरपीएफला पूर्ण सहकार्य करण्यास सांगितले आहे. केंद्राच्या सूचनेनंतर राजस्थान पोलिसांनी अजमेर ते जयपूर या जनसंघर्ष पदयात्रेदरम्यान सुरक्षा व्यवस्था करण्यास सुरुवात केली आहे. अजमेरमध्ये यात्रेच्या सुरुवातीलाही कडक पोलीस बंदोबस्त पाहायला मिळाला.

पायलट समर्थकांनी काँग्रेस अध्यक्षांना लिहिले पत्र

दुसरीकडे, पायलट समर्थक नेत्यांनी काँग्रेस हायकमांडला या वादात हस्तक्षेप करण्यास सांगितले आहे. पायलट समर्थक काँग्रेसचे आमदार वेदप्रकाश सोळंकी यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधी यांना पत्र लिहून राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीबद्दल सांगितले आहे. यासोबतच सोलंकी यांनी राहुल गांधी आणि पक्षाध्यक्ष खर्गे यांना राजकीय समन्वय प्रस्थापित करण्याची विनंती केली आहे. पत्रात सोळंकी यांनी प्रदेश प्रभारी रंधवा यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले असून, आमचे सध्याचे प्रभारी नेत्यांमध्ये समन्वय प्रस्थापित करू शकत नसल्याचेही म्हटले आहे. सोलंकी यांनी मल्लिकार्जुन खर्गे यांना या प्रकरणाची माहिती घेऊन राजस्थानच्या राजकारणात समन्वय निर्माण करण्याची विनंती केली आहे.


अधिक वाचा :

Back to top button