Microsoft’s Satya Nadella : मायक्रोसॉफ्टच्या सत्या नाडेला यांनी कर्मचाऱ्यांना दिली वाईट बातमी

Microsoft’s Satya Nadella : मायक्रोसॉफ्टच्या सत्या नाडेला यांनी कर्मचाऱ्यांना दिली वाईट बातमी

पुढारी ऑनलाईन डेस्क : या पुर्वीच मायक्रोसॉफ्ट या कंपनीने यंदाच्या वर्षी जवळपास १० हजारहून अधिक कर्मचाऱ्यांना नारळ देण्याचे ठरवले आहे. अनेक कर्मचाऱ्यांसाठी ही एक मोठी धक्कादायक गोष्ट असताना सध्या कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना आणखी एक मोठा झटका कंपनीने दिला आहे. बिझनेस इनसाईडरच्या माहितीनुसार, कंपनीचे सीईओ सत्या नडेला (Microsoft CEO Satya Nadella) यांनी कर्मचाऱ्यांना (Microsoft employees) सांगितले आहे की, या वर्षी कर्मचाऱ्यांना वेतन वाढ (salary hike) मिळणार नाही. तसेच उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना अत्यंत कमी बोनस मिळण्याची शक्यता आहे. (Microsoft's Satya Nadella)

आर्थिक अनिश्चिततेचा दिले कारण (Microsoft's Satya Nadella)

मायक्रोसॉफ्टने AI वर मोठा दाव खेळला आहे आणि त्याच्या सर्व प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे. नाडेला यांनी कर्मचाऱ्यांना केलेल्या मेल मध्ये म्हणतात "आम्ही स्पष्ट आहोत की आम्ही AI च्या या नवीन युगात एक प्रमुख प्लॅटफॉर्म बदलण्यास मदत करत आहोत आणि जागतिक व्यापक आर्थिक अनिश्चिततेचा सामना करताना गतिशील, स्पर्धात्मक वातावरणात असे करत आहोत,"

बिझनेस इनसाईडरच्या नडेला यांनी असेही सांगितले की कंपनी बोनस आणि स्टॉक पुरस्कार देईल, परंतु वाढवणार नाही, "आम्ही या वर्षी आमचे बोनस आणि स्टॉक अवॉर्ड बजेट पुन्हा राखून ठेवू, तथापि, आम्ही ते गेल्या वर्षीच्या तुलनेत आमच्या ऐतिहासिक सरासरीच्या जवळ आणणार नाही," असे सुद्धा मायक्रोसॉफ्टचे सीईओ म्हणाले. (Microsoft's Satya Nadella)

हे गेल्या वर्षीच्या तुलनेत उलट घडत आहे मायक्रोसॉफ्ट कंपनीचा पगारवाढीसाठी बाबातचा विचार खूप उदार असा होता. 2022 मध्ये, नाडेला यांनी कर्मचाऱ्यांना सांगितले होते की मायक्रोसॉफ्टने "ग्लोबल मेरिट बजेट"ला दुप्पट करण्यात आलेले आहे. दुसऱ्या शब्दांत सांगायचे झाले तर, मायक्रोसॉफ्टने बर्‍याच देशांमध्ये मध्यम-स्तरावरील कर्मचाऱ्यांना भरीव वाढ दिली होती. वाढत्या महागाईमुळे सुद्धा मायक्रोसॉफ्टने गेल्या वर्षी लक्षणीय वाढ केली होती.

इतर अनेक टेक कंपन्यांनीही कर्मचारी काढून टाकले (laying off) आहेत आणि खर्चात कपातीचे कठोर धोरण अवलंबले आहे. उदाहरणार्थ, Google ने 12,000 कर्मचार्‍यांना कामावरून काढून टाकले आणि त्यांना मिळणाऱ्या अनेक लाभांना कमी केले. मेटा(Meta), अॅमेझॉन (Amazon), इंटेल (Intel) ही काही मोठी नावे आहेत ज्यांनी हजारो कर्मचाऱ्यांना कामावरून काढले आहे.

अधिक वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news