NIA Raid : एनआयएचे दिल्लीच्या शाहीन बागमध्ये छापे; केरळमध्ये रेल्वेत आग लावल्याचे प्रकरण | पुढारी

NIA Raid : एनआयएचे दिल्लीच्या शाहीन बागमध्ये छापे; केरळमध्ये रेल्वेत आग लावल्याचे प्रकरण

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : केरळमधील कोझिकोडे येथे चालत्या रेल्वेगाडीत आग लावल्याच्या प्रकरणी राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) गुरुवारी दिल्लीतील शाहीन बागमध्ये दहा ठिकाणी छापे टाकले. 2019 साली नागरिकता कायद्याविरोधातील आंदोलनाच्या निमित्ताने हा भाग चर्चेत आला होता.
गेल्या महिन्यात केरळमधील कोझिकोडे येथे शाहरुख सैफी नावाच्या इसमाने चालत्या रेल्वेत प्रवाशांवर हल्ला चढवित गाडीला आग लावण्याचा प्रयत्न केला होता. या हल्ल्यात तीन लोकांचा मृत्यू झाला होता तर नऊ लोक जखमी झाले होते. आरोपी सैफी आणि इतर संशयितांच्या शाहीन बागमधील ठिकाणांवर एनआयएने छापे टाकले असल्याची माहिती सूत्रांनी दिली. शाहीन बागचा रहिवासी असलेल्या सैफी याला पोलिसांनी रत्नागिरी येथे अटक केली होती.

Back to top button