पुढारी ऑनलाईन : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमारांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. देशातील विराेधी पक्षांनी भाजपविराेधात एकत्र येण्याची गरज आहे, असे आवाहन त्यांनी या भेटीनंतर आयाेजित पत्रकार परिषदांमध्ये त्यांनी केले.
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याबराेबर झालेल्या चर्चेनंतर आयाेजित पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार शरद पवार म्हणाले की, भाजप देश हिताविरोधात काम करत आहे. देशात लोकशाही वाचवण्यासाठी विराेधी पक्षांनी एकत्र काम करणे गरजेचे आहे. त्यामुळे भाजपविरोधी लढण्यासाठी सर्व विरोधी पक्षांनी एकत्र राहणे गरजेचे असल्याचे आहे, कर्नाटकमधील वातावरण पाहता सत्तांतर होईल,अशी मला खात्री आहे. यावर मी समाधानी असून आम्ही काँग्रेससोबत असल्याचेही पवार यांनी सांगितले. (Nitish Kumar meets shrad pawar and Uddhav Thackeray ) या पत्रकार परिषदेला बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव हेही उपस्थित होते.
यावेळी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार म्हणाले, देशात भाजप ज्याप्रकारे काम करत आहे ते देशाच्या हितविरोधी आहे. त्यामुळे देशातील विरोधी पक्षांनी शक्य तेवढे एकत्र राहून भाजपला टक्कर दिली पाहिजे. विरोधी पक्षांनी एकाच मार्गावर चालले पाहिजे. यासाठीच आम्ही अनेक राज्यातील विरोधी पक्षांच्या भेटी घेत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. देखील नितीशकुमार यांनी या पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
आज (दि.११) दुपारी नितीश कुमार आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी उद्धव ठाकरे यांची देखील मातोश्रीवर भेट घेतली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत देखील बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी उपस्थिती दाखवली. या भेटी दरम्यान लोकसभा निवडणुकीपूर्वी विरोधी पक्षांची एकजूट मजबूत करण्यासाठी चर्चा करण्यात आली.