Wrestlers Protest: WFI प्रकरणातील महिला कुस्तीपटूंचे दिल्ली पोलिसांनी जबाब नोंदवले | पुढारी

Wrestlers Protest: WFI प्रकरणातील महिला कुस्तीपटूंचे दिल्ली पोलिसांनी जबाब नोंदवले

पुढारी ऑनलाईन: WFI आणि बृजभूषण यांच्याविरोधात कुस्तीपटूंचे जंतरमंतरवर आंदोलन सुरू आहे. भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण सिंग यांच्यावर महिला कुस्तीपटूंकडून लैंगिक छळाचे आरोप करण्यात आले आहेत. यानंतर न्यायालयाच्या आदेशानंतर याप्रकरणातील महिला कुस्तीपटूंचे जबाब नोंदवले गेले असल्याची माहिती दिल्ली पोलिसांनी दिल्याचे वृत्त एएनआयने दिले आहे.

या प्रकरणातील महिला कुस्तीपटूंचे दिल्लीतील दंडाधिकाऱ्यांसमोर जबाब नोंदवण्यात आले आहेत. हे जबाब CrPC 164 अंतर्गत नोंदवण्यात आल्याचे देखील दिल्ली पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

पुढील सुनावणी १२ मे रोजी

महिला कुस्तीपटूंचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप करत बृजभूषण सिंग यांच्यावर कारवाई करण्‍याची मागणी कुस्तीपट्टूंनी केली आहे. महिला कुस्तीपटूंचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप करत बृजभूषण सिंग यांच्यावर कारवाई करण्‍याची मागणी कुस्तीपट्टूंनी केली आहे. दरम्यान, याची दखल घेत दिल्ली न्‍यायालयाने पोलिसांकडे अहवाल मागवला आहे. याप्रकरणी १२ मे रोजी सुनावणी घेण्यात येईल, असेही न्‍यायालयाने स्पष्ट केले आहे.

हेही वाचा:

Back to top button