Amritsar Blast News | अमृतसर हादरले! सुवर्ण मंदिराजवळ तिसऱ्यांदा बॉम्बस्फोट; ५ जणांना अटक

 Amritsar Blast News | अमृतसर हादरले! सुवर्ण मंदिराजवळ तिसऱ्यांदा बॉम्बस्फोट; ५ जणांना अटक

पुढारी ऑनलाईन डेस्क : पंजाब राज्याच्या अमृतसरमधील सुवर्ण मंदिरमधील जवळ तिसऱ्यांदा बॉम्बस्फोट झाला आहे. अलिकडच्या तीन दिवसातील हा तिसरा बॉंम्बस्फोट आहे. या बॉंम्बस्फोटमुळे लोकांच्या मनात भितीचे वातावरण तयार झाले आहे. या घटनेत कोणतीही जीवित हानी झालेली नाही. माहितीनुसार बुधवारी (दि.१) मध्यरात्रीनंतर स्फोट झाल्याचा आवाज आला. हा आवाज खूप लांबपर्यंत येत होता. आवाजामुळे नागरिक घाबरून बाहेर आले. हा बॉंम्बस्फोट पहिल्या स्फोटाच्या ठिकाणापासून मोठ्या अंतरावर आहे. दरम्यान बॉम्बस्फोट प्रकरणात 5 सूत्रधारांना अटक करण्यात आली आहे.

पंजाब पोलिसांच्या माहितीनुसार, अमृतसर बॉम्बस्फोटाचा कट रचणाऱ्या पाच सूत्रधारांना अटक करण्यात आली आहे. शांतता भंग करण्याचा या स्फोटामागील हेतू होता. स्फोटात फटाक्यांमध्ये वापरण्यात आलेली स्फोटके वापरण्यात आली होती. पोलिस लवकरच पत्रकार परिषद घेऊन अधिक माहिती दिली.

 Amritsar Blast News : यापूर्वीही  दोन  बॉम्बस्फोट

शनिवारी (दि.६) रात्री उशिरा दरबार साहिबजवळील हेरिटेज स्ट्रीटवर बॉम्बस्फोट (Amritsar Blast)  झाला. त्यानंतर श्री हरिमंदिर साहिब जवळील हेरिटेज स्ट्रीट परिसरात सोमवारी (दि.८) सकाळी ६:३० वाजता पुन्हा स्फोट झाला. शनिवारी (दि.६) रात्री उशिरा घडलेल्या घटनेपासून २०० मीटर अंतरावर हा स्फोट झाला.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news