Devendra Fadnavis : बियाणांत फसवणूक झाली तर विक्रेत्यांवर फौजदारी कारवाई; देवेंद्र फडणवीसांचा इशारा | पुढारी

Devendra Fadnavis : बियाणांत फसवणूक झाली तर विक्रेत्यांवर फौजदारी कारवाई; देवेंद्र फडणवीसांचा इशारा

पुढारी ऑनलाईन डेस्क : बियाणांत फसवणूक झाली तर संबंधीतांवर फौजदारी खटला भरला जाईल, असा इशारा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. आज वर्धा येथे फडणवीस यांनी खरीप आढावा बैठक घेतली, यावेळी ते बोलत होते.

खरीप आढावा बैठकीनंतर फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, पेरणीसाठी शेतकऱ्यांना योग्य बियाणं उपल्बध करून दिली जातील. पेरणीसाठी पुरेशी बियाणे आहेत. तरीही बाहेरून घेत असलेल्या बियाणांची गुणवत्ता तपासण्याच्या सुचना दिल्या आहेत. शेतकऱ्यांनी बियाणांची पावती जपून ठेवावी. बियाणे घेतल्यानंतर त्याच्यात फसवणूक झाली तर भरपाई मिळते, असे आवाहन त्यांनी शेतकऱ्यांना केले. शिवाय बोगस बियाणे विक्रेत्यांवर फौजदारी खटला भरला जाईल, असा इशाराही फडणवीस यांनी विक्रेत्यांना दिला आहे.

सत्तासंघर्षावर देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान

सत्तासंघर्षावर सुप्रिम कोर्टाने निर्णय देण्याच्या आधीच राज्यातील काही राजकीय पंडीत आणि काही पत्रकार यांनी निर्णय दिला. पुढचे सरकारही तयार करून टाकले. मला वाटतं हे योग्य नाही. शांतपणे निर्णयाची वाट पाहावी, आम्ही पूर्णपणे आशादायी आहे. काही होणार नाही. आम्ही कायदेशीर केले आहे, त्यामुळे योग्य निर्णय येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

हेही वाचा : 

Back to top button